Vitamin D Side Effects: व्हिटॅमिन Dच्या जास्त डोस घेतल्यास किडनी स्टोनचा धोका, तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

Heart Care: जास्त व्हिटॅमिन D घेतल्याने शरीरात कॅल्शियम वाढतो आणि त्यामुळे हृदय व किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
vitamin D side effects
vitamin D overdosesaam tv
Published On
Summary

व्हिटॅमिन D शरीरासाठी आवश्यक असलं तरी जास्त प्रमाणात घेतल्यास ते हानिकारक ठरू शकतं.

जास्त डोस घेतल्याने रक्तात कॅल्शियम वाढून किडनीवर परिणाम होतो.

सप्लिमेंट घेण्यापूर्वी रक्त तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन D हे शरीरासाठी आवश्यक जीवनसत्व मानलं जातं. हाडं मजबूत ठेवणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवणं आणि मूड सुधारण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. मात्र डॉक्टरांचा इशारा आहे की, याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन D घेणं शरीरासाठी उलटं ठरू शकतं. आजकाल बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता आढळते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने सप्लिमेंट घेतल्याच पाहिजेत.

व्हिटॅमिन D चे जास्त सेवन केल्याने शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्या आणि किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन D ची गरज आहे की नाही, हे साध्या रक्त तपासणीतून कळतं. काही लोकांसाठी हे फायदेशीर ठरतं, तर काहींसाठी हानिकारकही ठरू शकतं असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

vitamin D side effects
Delhi Blast: इतिहासाची पुनरावृत्ती? २००५च्या स्फोटांनंतर पुन्हा एकदा दहशतीचा माहोल, वाचा दिल्लीतील स्फोटांची संपूर्ण यादी

व्हिटॅमिन D शरीरात एकटं कार्य करत नाही. त्याला सक्रिय करण्यासाठी मॅग्नेशियम आणि कॅल्शियमला हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिटॅमिन K2 ची आवश्यकता असते. त्यामुळे तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणं टाळलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन D घेतो तेव्हा शरीरातील कॅल्शियमचे शोषण वाढते. हे जास्त कॅल्शियम रक्तात जमा होऊन हळूहळू रक्तवाहिन्या आणि किडनीमध्ये साचतं. यामुळे रक्तवाहिन्या घट्ट होतात, ज्याचा परिणाम हृदय आणि किडनीवर होतो. यामुळे किडनी स्टोन किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

व्हिटॅमिन D ओव्हरडोजचे सुरुवातीच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, थकवा, जास्त तहान लागणे आणि वारंवार लघवी होणे यांचा समावेश होतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते हृदय आणि किडनीसंबंधी गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे व्हिटॅमिन D सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

टीप: जर तुम्हीही नियमित व्हिटॅमिन D सप्लिमेंट घेत असाल, तर पुढच्या डोसपूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांशी नक्की सल्लामसलत करा.

vitamin D side effects
Belly Fats Tips: मेथी दाणे की बडीशेप पाणी? बारिक होण्यासाठी काय आहे योग्य? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com