

दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ रोजी सांयकाळी ६ वाजता लाल किल्याजवळ बॉम्ब स्फोट झाला. दिल्लीतल्या या स्फोटाने वाहनांची ठिकरी उडाली, सगळीकडे वणव्यासारखी आग पसरत गेली लोकांची धावपळ सुरु झाली.
दिल्लीतील हा स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची घरं हादरली. हा स्फोट गाडीत झाला. पुढे याने आणखी तीन गाड्यांना आग लागली. 8 जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पुढे आपण दिल्ली हादरवणारे बॉम्ब स्फोट कितीदा झाले आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.
दिल्लीमध्ये २५ मे १९९६ रोजी लाजपत नगर सेंट्रल मार्केटजवळ बॉम्ब स्फोट झाला होता. त्यामध्ये १६ निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला होता. पुढे १ ऑक्टोबर १९९७ रोजी दिल्लीतील सदर बाजारात दोन स्फोट झाले होते. नंतर ९ दिवसांनी पुन्हा दिल्लीतील शांतीवन, कौडीया पुल आणि किंग्सवे कॅपच्या परिसरात तीन स्फोट झाले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.
१८ ऑक्टोबर १९९७ रोजी राणी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. २६ ऑक्टोबर १९९७ रोजी करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट झाले होते. त्यामध्ये १ मृत्यू झाला होता. मग ३० नोव्हेंबर १९९७ रोजी लाल किल्याजवळ स्फोट झाला होता. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता.
३० डिसेंबर रोजी १९९७ रोजी पंजाबी बागेजवळ स्फोट झाला होता. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता. १८ जून २००० रोजी लाल किल्याजवळ दोन मोठे स्फोट झाले होते. यानंतर १६ मार्च, २७ फेब्रूवारी २००० रोजी दिल्लीत स्फोट झाले. १४ एप्रिल २००६ रोजी जामा मस्जिद प्रांगणमध्ये २ स्फोट झाले होते. मग २२ मे २००५ रोजी सत्यम सिनेमा हॉलजवळ स्फोट झाला.
दिल्लीतला सगळ्यात मोठा बॉम्ब स्फोट म्हणजे २९ ऑक्टोबर २००५ मध्ये सारोजिनी नगर, रोजी सारोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरीमध्ये तीन स्फोट झाले. यामध्ये ६२ निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला होता. १३ सप्टेंबर २००८ रोजी करोल बागेजवळील गफ्फार मार्केट, कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाशजवळ ५ स्फोट झाले होते. त्यामध्ये ३० व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
२७ सप्टेंबर २००८ रोजी मेहरोलीच्या फ्लॉवर मार्केटमध्ये स्फोट झाला होता. त्यामध्ये ३ जणांना मृत्यू झाला होता. २५ मे २०११ मध्ये दिल्ली हाय कोर्ट पार्किंगजवळ स्फोट झाला होता. त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.