केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नागरिकांना दर वर्षी ६००० रुपये मिळतात.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला दर वर्षाला तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. दर ४ महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. त्यामुळे वर्षाला ६००० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १८ हप्ते जमा करण्यात आले आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८वा हप्ता ५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता. देशातील तब्बल ९.४ कोटी शेतकऱ्यांना १८वा हप्ता मिळाला आहे. केंद्र सरकारने ५ ऑक्टोबर रोजी तब्बल २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.
पीएम सन्मान निधी योजना २४ फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेत ३ समान हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कामांमध्ये किंवा अवजारे विकत घेण्यासाठी मदत होते. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे.(Pm KIsan Sanman Nidhi Yojana)
या योजनेत तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी pmmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटवर तुम्हाला Beneficiary List हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव याबाबत माहिती भरायची आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर एक रिपोर्ट दिसेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर लाभार्थ्यांची नावे दिसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.