केंद्र सरकारने आतापर्यंत मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे कन्या सुमंगला योजना.
उत्तर प्रदेश सरकारने कन्या सुमंगला योजना राबवली आहे. कन्या सुमंगला योजनेअंतर्गत मुलींना २५,००० रुपये दिले जातात. मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे, त्यांना उच्च शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकार गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींसाठी आर्थिक मदत केली. कन्या सुमंगला योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. मुलींना समाजात योग्य स्थान मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.sky.up.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
कन्या सुमंगला योजनेत अर्ज करणारा उमेदवार उत्तर प्रदेश राज्याचा रहिवासी असावा. त्याच्याकडे निवासी प्रमाणपत्र असावे. याचसोबत रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी, वीजेचे बिल किंवा टेलीफोन बिल ही कागदपत्रे असायला हवी.
कन्या सुमंगला या योजनेत अर्ज करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच तुम्ही एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींच्या नावावर खाते उघडू शकतो. ज्या मुलींचा जन्म १ एप्रिल २०२९ नंतर झाला आहे त्याच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकार करते.
सर्वप्रथम तुम्ही sky.up.gov.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर Citizen Servixe Portal वर क्लिक करा. यानंतर तुमची सर्व आवश्यक माहिती भरा. यामध्ये स्वतः चे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आई वडिलांचे नाव, आधार नंबरचा समावेश आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. यानंतर पुन्हा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा. पुन्हा एकदा लॉग इन करुन कागदपत्रे सबमिट करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.