PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा निधी वाढण्याची शक्यता; 2000 रुपये जास्त मिळणार?

Farmers News : केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजार रूपयांवरून 8 हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana Saam Tv
Published On

PM Kisan Yojana :

केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांन गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.  पीएम किसान योजनेच्या निधीच्या (PM Kisan Yojana) रकमेत सरकार वाढ करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजार रूपयांवरून 8 हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी 5 मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest News)

PM Kisan Samman Nidhi Yojana
Gold Silver Price Today (6th October) : सोन्याच्या भावात २००० रुपयांनी घसरण, तुमचा शहरात आजचा भाव किती?

CNBC-TV18 च्या अहवालानुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. योजनेतून अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकल्यामुळे ही बचत झाली आहे.

सुमारे 1.72 कोटी अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती अहवालात आहे. त्यामुळे ही बचत करणे शक्य झाले आहे. ही मोठी बचत पाहता सरकार पीएम-किसानचा निधी वाढवू शकते, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana: ई-केवायसीशिवाय १५ व्या हप्त्याचा लाभ मिळेल का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम-किसान योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिला जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com