PM Kisan Yojana: ई-केवायसीशिवाय १५ व्या हप्त्याचा लाभ मिळेल का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागते.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

PM Kisan Yojana 15th installment:

देशातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या १५ व्या हप्ताची वाट पाहत आहेत. सरकारवर लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळाला नव्हता. सरकार या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत असतात. दर तीन महिन्यानंतर २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात पाठवला जातो.(Latest News)

परंतु पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? तर उत्तर आहे, हो, ई-केवायसी करणं आवश्यक आहे. कारण पीएम किसान योजनेचा लाभ काही अपात्र व्यक्तीही घेत होते. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे, त्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. यामुळे या योजनेतील घोटाळा रोखण्यासाठी सरकारनं काही नियम अटी यात घातल्या आहेत. त्यातील एक नियम म्हणजे ई-केवायसी. आता आपल्यातील अनेकांना प्रश्न पडला असेल की, ई-केवायसी कसं कायरचं.

शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी बसून ई-केवायसी करू शकतात. यासाठी स्मार्टफोन असं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसेल तर ते शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाणून ई-केवायसी करू शकतात. तसेच शेतकरी पीएम किसान पोर्टलवर ओटीपी बेस्ट ई-केवायसी करू शकतात.

कशी कराल ई-केवायसी

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट www.pmkisan.gov.inला भेट द्यावी.

  • ही वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेजेवर ई-केवायसीचा पर्याय दिसेल.

  • त्यात आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सर्चवर क्लिक करा.

  • त्यानंतर आधार कार्डवर नोंदणी करण्यात आलेला मोबाईल नंबर तेथे नोंदवा.

  • त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल.

  • गेट ओटीपीवर क्लिक करा.

  • ओटीपी नोंदवल्यानंतर इंटरवर क्लिक करा.

  • आता पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण झाली.

सीएससीमध्ये करा E-KYC

कॉमन सर्व्हिस सेंटरवर पण ई-केवायसी करता येईल. या केंद्रात गेल्यानंतर बायोमॅट्रिक पद्धतीनं ई-केवायसी करता येईल. दरम्यान यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईलची गरज लागेल. ई-केवायसी करण्यासाठी सीएससी ऑपरेटर १० ते २० रुपये सर्व्हिस चार्ज घेत असतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: कुटुंबातील किती सदस्यांना मिळू शकतो पीएम किसान योजनेचा लाभ? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com