राज्याची विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आज मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल महत्वाची माहिती जाहीर केली आहे. मनोज जरांगे म्हणाले आहेत की, ''आजच्या बैठकीत काहीही ठरलेले नाही. सगळ्यांशी फक्त चर्चा झाली. पुढे काय करायला पाहिजे याबाबत चर्चा झाली.''
ते म्हणाले, ''शेती, आरक्षण, दलीत मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आज फक्त चर्चा झाली. अठरा पगड जाती, दलीत, मुस्लिम यासाठी काम करायचं आहे. 95 टक्के समाजकारण आणि 5 टक्के राजकारण. उमेदवारबाबत चर्चा झाली. मात्र निवडणूक लढविण्यासाठी आलेल्या इच्छुक यांची मते जाणून घेतली.''
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अंतिम निर्णय 20 तारखेला होईल. तेथे समाज बांधव येतील त्यांच्या साक्षीने निर्णय घेतला जाईल. मी सर्वांची मत जाणून घेतली, समाजाचा एकूण घेणं माझं काम आहे. त्यामुळे कुणीही उद्या बोलू नये. मत मांडू दिलं नाही म्हणून. जो निर्णय 20 तारखेला होईल तो समजाच्या हिताचा होईल. 1800 अर्ज आले होते, आज पुन्हा प्रचंड अर्ज इच्छुकांचे अर्ज आले आहेत.''
जरांगे पुढे म्हणाले की, ''ही लाट आहे. ही लाट देवेंद्र फडणवीस यांची वाट लावेल. या मनःस्थितीत जायला फडणवीस यांनी भाग पाडलं. अनेक राज्यकर्ते होऊन गेले, त्यानी समाजाचं काम केलं. मात्र फडणवीस डागी माणूस आहे.''
ते म्हणाले, ''जाता जाता फडणवीस मराठ्यांच्या काळजावर वार करून गेले. त्यांना मराठ्यांशी घेणंदेणं नाही, ओबीसीशी घेणंदेणं आहे. हे सांगून गेले. ओबीसीच्या जातीत काही, जाती टाकून अनेक ओबीसी जातींचं आरक्षण कमी केलं.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.