१ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी जुलै महिना खूप महत्त्वाचा असतो. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व करदात्यांना आयटीआर फाइल करायचा असतो. आयटीआर फाइल करण्यासाठी अनेक लोक सीए (Chartered Accountant) ची मदत घेतात. परंतु तुम्ही घरबसल्यादेखील आयटीआर फाइल करु शकतात. (Income Tax Return)
आयटीआर फाइल करणे खूप कठीण काम असल्याचे सर्वांना वाटते. परंतु फॉर्म 16, फॉर्म 26AS, AIS आणि TIS फॉर्ममुळे हे खूप सोपे झाले आहे. त्यामुळे आयटीआर फाइल करताना ही चार कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आयटीआर फाइल करु शकता. तुम्ही सीएचे पैसे देण्याचीही गरज पडणार नाही.
CA शिवाय आयटीआर फाइल कसा करायचा? (Can I file ITR without CA?)
सर्वप्रथम तुमच्याकडे फॉर्म 16, फॉर्म 26AS, AIS आणि TIS फॉर्म हे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी आयकर विभागाच्या पोर्टला भेट द्यावी लागेल. तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जावे.
यानंतर तुमचे आधीपासूनच अकाउंट असेल तर लॉग इन करावे लागेल. अन्यथा तुम्हाला 'रजिस्टर ' या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर होमपेजवर फाइल या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर आयकर रिटर्न भरा यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला चालू वर्ष सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर 'इंडिविजुअल'हा ऑप्शन निवडा.
यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म सिलेक्ट करायचा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आईटीआर-1 फॉर्म सिलेक्ट करायचा आहे.
यानंतर तुम्हाला सॅलरी स्लिप, फॉर्म 16, AIS ही माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा डेटा वेरिफाय होईल. यानंतर रिटर्न क्लेम करण्यासाठी बँक डिटेल्स टाका. योग्य बँक डिटेल्स टाका.
यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने चेक करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.
आयटीआर फाइल केल्यानंतर किती दिवसांत परतावा येतो? (How many days will an ITR refund take?)
साधारणपणे आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जुलै महिन्याची असते. त्यामुळे तुम्ही आयटीआर फाइल केल्यानंतर ३-४ आठवड्यात तुम्हाला परतावा येतो. त्यामुळे जवळपास १ महिन्यात तुम्हाला तुमचा परतावा मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.