Income Tax Rules: तुम्ही कर भरताय? मग तुम्हाला Income Taxचे नवीन नियम माहिती आहेत का?

Income Tax Rules: 2024-25 च्या अर्थसंकल्पात आयकर नियमांबाबत काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या सर्वांना माहित असणं आवश्यक आहे.
 Income Tax budget
Income Tax RuleGoogle
Published On

अर्थमंत्री निर्मला सीतारम ह्या देशाचं आर्थिक बजेट १ फेब्रुवारी २०२५ ला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामन्य नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. सरकार मोठं मोठ्या घोषणा करेल अशी आशा नागिरकांना आहे. पगारदार वर्गालाही अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. 2024-25 च्या अर्थसंकल्पात आयकर नियमांबाबत काही मोठ्या घोषणा होत्या. त्या आपण समजून घेऊ.

 Income Tax budget
SIP investment benefits: २००० रुपयांची SIP करा आणि करोडपती व्हा; जाणून घ्या श्रीमंतीचा फॉर्म्युला, फक्त एका क्लिकवर

करदात्यांना अधिक दिलासा मिळावा यासाठी नवीन करप्रणालीत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आलाय. नवीन कर स्लॅब खालीलप्रमाणे होते.

रु ०-३ लाख: ०% कर

रु. 3-7 लाख: 5%

रु 7-10 लाख: 10%

रु. 10-12 लाख: 15%

रु. 12-15 लाख: 20%

रु 15 लाख आणि त्याहून अधिक: 30%

 Income Tax budget
Budget 2025: इन्कम टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन अन् बरंच काही...; अर्थसंकल्पाकडून करदात्यांना ५ अपेक्षा

हे नवीन स्लॅब करदात्यांना 17,500 रुपयांपर्यंत वाचवण्यास मदत करू शकतात. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्यात आलीय. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आलीय. कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांची मर्यादाही 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आलीय.

 Income Tax budget
Gold Price Today : गुड न्यूज! आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव घटला, पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

यामुळे पगारदार आणि निवृत्त झालेल्यांना करदात्यांना दिलासा मिळेल. राष्ट्रीय पेन्श प्रणालीत कंपनीच्या योगदानात कपात करत 10 टक्क्यांनी वाढवून 14 टक्के करण्यात आलाय. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये अधिक बचत करता येईल.

भांडवली नफा करात बदल

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) वरील कर दर 15% वरून 20% पर्यंत वाढला.

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) वरील कर दर 10% वरून 12.5% ​​पर्यंत वाढला.

इक्विटी गुंतवणुकीवरील LTCG सूट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 1.25 लाख रुपये झाली.

या बदलाचा उद्देश गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे हा होता.

लक्झरी वस्तूंवर टी.सी.एस

10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंवर स्रोतावर कर संकलन (TCS) लागू करण्यात आले. हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू झाला. महागड्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि करचोरी कमी करणे हा या निर्णयामागचा उद्देश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com