Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर

Income tax rules 2025 India: येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये १० लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकतो.
Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Income TaxSaam Tv
Published On

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या पगारानुसार तुम्हाला किती कर भरावा लागतो हे ठरत असते. कर्मचाऱ्यांचे पगार जसजसे वाढतात तशी त्यांची चिंता देखील वाढते कारण त्यांच्या डोक्यावर कराचं ओझं देखील वाढते. दरवर्षी तुम्हाला कर भरावा लागतो. पण आता करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये १० लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. त्यांना कर भरावा लागणार नाही,असा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. तुमचा पगार किती आणि तुम्हाला कितीपर्यंत कर भरावा लागू शकतो यासोबतच आताचा टॅक्स स्लॅब कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Income Tax Vacancy 2025: परिक्षा नाही थेट नोकरी, आयकर विभागात काम करण्याची मोठी संधी, पगार लाखांहून अधिक

सध्या नोकरदारवर्गाला त्यांच्या पगारानुसार दोन करप्रणाली निवडण्याचा पर्याय आहे. करदायित्व कमी करण्यासाठी करदाते जुन्या करप्रणालीचा अवलंब करतात. तर काही करदाते नव्या करप्रणालीचा वापर करतात. या नव्या करप्रणालीमध्ये १५ लाख रुपयांपर्यंतच्या वेतनासाठी कमी कर आहे. यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे असे करदाते नवीन करप्रणालीचा पर्याय निवडतात. या दोन्ही करप्रणालीमध्ये कितीपर्यंतच्या उत्पन्नाला कर माफ आहे आणि कितीपर्यंतच्या उत्पन्नाला किती कर भरावा लागतो हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.

Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Income Tax Recruitment: आयकर विभागात नोकरीची संधी, मिळणार १ लाख रुपये पगार, या पदासाठी भरती सुरु; जाणून घ्या

जुन्या करप्रणालीनुसार टॅक्स स्लॅब कसा आहे -

२.५ लाख रुपयांपर्यंत - ० टक्के

२.५ लाख ते ५ लाखांपर्यंत - ५ टक्के

५ लाख ते १० लाख - २० टक्के

१० लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के

नव्या करप्रणालीनुसार टॅक्स स्लॅब - (महत्वाचे म्हणजे नव्या करप्रणालीमध्ये टॅक्स स्लॅबव्यतिरिक्त करदात्यांना त्यांच्या कर दायित्वावर ४ टक्के उपकर देखील भरावा लागतो.)

३ लाख रुपयांपर्यंत - ० टक्के

३ लाख ते ६ लाख - ५ टक्के

६ लाख ते ९ लाखांपर्यंत - १० टक्के (१५००० रुपये + १० टक्के)

९ लाख ते १२ लाखांपर्यंत - १५ टक्के (४५००० रुपये + १५ टक्के)

१२ लाख ते १५ लाखांपर्यंत - २० टक्के (९०००० रुपये + २० टक्के)

१५ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के (१,५०,००० रुपये + ३० टक्के)

Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Income Tax Bharti: आयकर विभागात काम करण्याची संंधी; पात्रता १०वी, १२वी पास; जाणून घ्या पगार आणि इतर पात्रता

आता केंद्र सरकार कोट्यवधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यवधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १० लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना नव्या वर्षाची भेट देण्याची शक्यता आहे.

२०२५ मध्ये जर सरकारने जर नवी करप्रणाली जाहीर केली तर करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. जर १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झालं तर मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावातून मुक्त होईल. करकपात झाल्यास मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळेल. कर कपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार आहे. नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल. ग्राहक खर्च वाढून अंतिमत: अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल.

Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Dolly Chaiwala Income : नागपुरच्या डॉली चायवाल्याची परदेशात हवा, कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

देशात साडेसात कोटी करदाते असून त्यापैकी ७० टक्के लोक हे करमुक्त श्रेणीत येतात. पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो. त्यामुळे जर १० लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल. १ फेब्रुवारीला जर नव्या करप्रणालीची घोषणा केली गेली, तर ० ते १० लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना फायदा होईल. कारण १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल.

Income Tax: तुमची वार्षिक कमाई किती? २०२५ मध्ये तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? वाचा सविस्तर
Income Tax Return: मुदत उलटूनही ITR फाइल नाही, आता काय कराल?, नो टेन्शन; लगेच चेक करा ३ पर्याय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com