Income Tax Bharti: आयकर विभागात काम करण्याची संंधी; पात्रता १०वी, १२वी पास; जाणून घ्या पगार आणि इतर पात्रता

Income Tax Department Recruitment: भारतीय आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयकर विभागातील या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.
Income Tax Bharti
Income Tax BhartiSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.भारतीय आयकर विभागात सध्या भरती सुरु आहे. ग्रूप सी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.

१०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. मुख्य आयकर आयुक्त (सीसीए) आणि आयकर विभागाद्वारे ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

इन्कम टॅक्स विभागात २५ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणी त्यांना पोस्ट केले जाऊ शकते. (Income Tax Department Bharti)

Income Tax Bharti
Government Job Opportunity: सरकार नोकरीची सुवर्णसंधी; 2.5 लाख मिळेल पगार, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (Income Tax Recruitment)

Income Tax Bharti
Railway Jobs : लोको पायलट ते स्टेशन मास्तर, कोकण रेल्वेत नोकरीची संधी;५०,००० रुपये मिळणार पगार, आजपासून प्रोसेस सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com