आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रयत्न आणि कामात सातत्य ठेवल्याने प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. असंच यश कुणाल शाह यांनी मिळवलं आहे. कुणाल शाह यांचे कुटुंबावर खूप कर्ज होते. त्यांनी स्वतः चा खर्च भागवण्यासाठी डिलिव्हरी बॉयची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी स्वतः ची कंपनी सुरु केली. या कंपनीची किंमत ५० हजार कोटी रुपये आहे.
कुणाल शाह यांचे कुटुंब Bankrupt होते. त्यांनी १६ वर्षांचे असल्यापासूनच काम करण्यास सुरुवात केले. सुरुवातीच्या काळात शिक्षणासोबत त्यांनी सकाळी क्लास आणि संध्याकाळी डेटा ऑपरेटरची नोकरी केली. गरीब परिस्थिती असतानाही त्यांमी कधी हार मानली नाही. त्यांनी क्रेड नावाची कंपनी सुरु केली. (Kunal Shah Success Story)
आज जवळपास १ कोटींपेक्षा जास्त लोकांकडे क्रेड अॅप आहे. २० टक्के लोक क्रेड अॅपनरुन क्रेडिट कार्डचे पेमेंट करतात. फिनटे कंपनी क्रेडचे निर्माते कुणाल शाह हे गुजरातचे रहिवासी आहेत. त्यांनी लहान वयात काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे डिग्री नसल्याने त्यांना नोकरी मिळण्यासाठी खूप अडचणी आल्या आहेत. त्यांनी डिलिव्हरी बॉय ते डेटा एंट्री अशी अनेक कामे केली.
मुंबईतील विल्सन कॉलेजमधून त्यांनी फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यांनी फिलॉसॉफी विषय निवडला कारण कॉलेज सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत होते. त्यानंतर ते डिलिव्हरी बॉयचे काम करायचे. रात्री डेटा एंट्रीचे काम करायचे. १६ व्या वर्षाची ते स्वतः च्या पायावर उभे राहिले. त्यांनी आपल्या घराच्या बाहेर लहान सायबर कॅफे उघडला. त्यानंतर ते हळू हळू टेक्नोलॉजीशी जोडले गेले. (CRED Company Founder Success Story)
CRED च्या आधी त्यांनी दोन स्टार्टअप सुरु केले होते. २०१५ साली त्यांनी स्नॅपडील ही कंपनी ४३० मिलियन डॉलरला खरेदी केली होती. रिपोर्टनुसार, CRED कंपनीची मार्केट कॅप ६ बिलियन डॉलर म्हणजेच ४९ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. कुणाल शाह यांनी संपत्ती १५००० कोटी रुपये आहे. ते स्वतः फक्त १५००० रुपये वेतन घेतात. (BusinesSman Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.