Success Story: कोचिंगशिवाय केली UPSCची तयारी अन् खर्चासाठी बांगड्या विकायचा; IAS रमेश घोलप यांचा खडतर प्रवास वाचा
प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने असतात. याबरोबर यशाच्या उंच शिखरावर पोहचण्याची इच्छा सर्वांची असते. यासाठी प्रत्येक नागरिक कठोर प्रयत्न आणि परिश्रम करत असतो. कधीकधी यशाच्या शिखरावर पोहचताना आपल्या वाटेला अपयश देखील येते. पण अपयशावर मात करुन अनेक नागरिक त्यांच्या आयुष्यात पुढे जातात. अशीच एक गोष्ट रमेश घोलप यांची आहे. ते आज यशाच्या शिखरावर जाऊन IAS अधिकारी झाले आहेत. जाणून घेऊया त्यांचे संपूर्ण यश.
कधीकधी आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वय, परिस्थिती आणि काळ पाहिला जात नाही. मनात जिद्द असेल तर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काहीना काही करु शकतो. अशीच जिद्द असणारे रमेश घोलप आहे. रमेश घोलप यांनी गरीब परिस्थितून आपले IAS स्वप्न पूर्ण केले आहे. रमेश घोलप हे सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणारे होते. रमेश घोलप यांच्या वडीलांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय होता. ते दररोज गावातल्या नागरिकांची सायकल दुरुस्त करायचे. याबरोबर रमेशचे वडील व्यसनी असल्यामुळे अचानक एकदा आजारी पडले. यानंतर त्यांच्यावर औषधे उपचार देखील सुरु होते. पण काही काळानंतर त्यांचे निधन झाले. या प्रसंगी रमेश घोलप लहान होते. कुंटुंबावर एवढे मोठे संकट आल्याने त्यांच्या आईने गावात बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. रमेशच्या आई कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हे काम करत होत्या. आईचे हे कष्ट पाहून रमेश घोलप यांनी सुद्धा आईला मदत करण्यास सुरुवात केली.
कुटुंबाची एवढी वाईट परिस्थिती असूनही, रमेश यांच्या मनात शिकण्याची इच्छा होती. रमेश यांनी कठिण प्रसगांवर मात करुन पुढील शिक्षणासाठी आपल्या काकांसोबत बार्शीला गेले. याबरोबर मनात शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने रमेश अभ्यासात खूप हुशार होते. घरात आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांनी बीएड डिप्लोमामध्ये शिक्षण पूर्ण केले. यानंतर रमेश यांनी २००९ मध्ये एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना एका तहसीलदाराकडून आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. मनात जिद्द आणि आईचा सल्ला घेऊन त्यांनी आपली शाळेतली नोकरी सोडली.
रमेश यांनी कठिण प्रंसगाचा सामना करुन UPSC परिक्षेची तयारी सुरु केली. UPSCच्या पहिल्या प्रयत्नांत ते यशस्वी झाले नाही. पण त्यांनी UPSCची संपूर्ण तयारी कोणत्याही कोचिंग क्लासेसमध्ये न जाता केली होती. पहिल्यावेळी अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी हार मानली नाही. यानंतर त्यांनी पुन्हा २०१२ मध्ये UPSC ची परिक्षा दिली आणि २८७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन IAS बनले.