Republic Day Parade Tickets Saam Tv
बिझनेस

Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावरील संचलन 'याचि देहि...' कसं अनुभवता येईल? वाचा सविस्तर

Republic Day Parade Tickets : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील संचलन पाहण्यासाठी आता ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेवू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Republic Day Parade Tickets Price

राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावरील संचलन भारताच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचं प्रदर्शन करते. देशभरातील लोकं परेड (Republic Day Parade) पाहण्यासाठी येथे येतात. ज्यामध्ये सांस्कृतिक प्रदर्शन, लष्करी प्रदर्शनं आणि बरंच काही समाविष्ट आहे. भारतीय नागरिकांना आरक्षित किंवा अनारक्षित तिकीटं घेता येतील. याची किंमत २० आणि १०० रुपये आहे. (Republic day latest news)

प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी (Republic Day 2024) हा दिवस भारतीय संविधान स्वीकारल्याचं प्रतिक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विजय चौकात विशेष परेडचं आयोजन केलं जातं. प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १० वाजता विजय चौकातून सुरू होईल आणि ५ किलोमीटरचे अंतर कापून नॅशनल स्टेडियमवर अंतिम टप्पा असेल. तुम्हालाही ही परेड पाहायची असेल, तर तुम्ही तिकीट बुक करू शकता. कर्तव्य मार्गावरील परेड भारताची समृद्ध संस्कृती आणि इतिहास दर्शवते. देशभरातील लोक परेड पाहण्यासाठी येथे येतात. तिकिटांचं बुकिंग आजपासून म्हणजेच १० जानेवारीपासून सुरू होतंय. २५ जानेवारीपर्यंत तिकिटे उपलब्ध असतील, मात्र दररोज मर्यादित संख्येतच तिकिटे उपलब्ध असणार आहेत. त्यांची किंमत याची २० आणि १०० रुपये आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिकीट बुक करण्याची पद्धत

संरक्षण मंत्रालयाच्या www.aamantran.mod.gov.in च्या अधिकृत वेब पोर्टलला भेट द्या. लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा. नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक तपशील भरा. मोबाइल नंबरवर पाठवलेल्या OTP सह पडताळणी करा. FDR प्रजासत्ताक दिन परेड, प्रजासत्ताक दिन परेड, बीटिंग द रिट्रीट या पर्यायांमधून एकपर्याय निवडा. पडताळणीच्या उद्देशाने उपस्थितांची माहिती द्या. मूळ फोटो आयडी अपलोड करा. ऑनलाइन तिकीट डाउनलोड करा. पेमेंट प्रक्रिया पूर्ण (Republic Day Parade Tickets) करा.

ऑफलाइन तिकिटे कुठे मिळणार

ऑफलाइन तिकिटं भारत सरकारच्या पर्यटन कार्यालय आणि DTDC काउंटर आणि IDTC प्रवास काउंटरवर उपलब्ध असणार आहेत. विभागीय विक्री काउंटर दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत तिकिटांची विक्री होईल, तर संसद भवनाच्या स्वागत कक्षातून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तिकीटांची विक्री होणार आहे. भारत सरकारचे पर्यटन कार्यालय रविवारी बंद राहील, तर संसद भवन शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी बंद राहील.

ऑफलाइन तिकीटं खरेदी करण्यासाठी काय आवश्यक

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी अधिकृत ऑफलाइन आउटलेट किंवा तिकीट काउंटरला भेट द्या. ओळखीचा पुरावा द्या. नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादीसह वैयक्तिक तपशीलांसह एक फॉर्म भरा. FDR रिपब्लिक डे परेड, रिपब्लिक डे परेड, बीटिंग द रिट्रीट या पर्यायांमधून एक कार्यक्रम निवडा. पडताळणीसाठी मूळ फोटो आयडीची फोटो प्रत द्या. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा आणि तिकीट गोळा करा.

प्रेक्षक त्यांच्या घरातून परेड पाहू शकतात. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल किंवा प्रेस ब्युरो ऑफ इंडिया वेबसाइटवर ऑनलाइन प्रसारित होईल. त्याच वेळी दूरदर्शन परेडचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT