Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंजाब आणि बंगालचे शोभारथ का नसणार? संरक्षण मंत्रालयाने सांगितलं कारण

Republic Day: शोभारथ निवडताना भेदभाव केला गेल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला होता. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने शोभारथाची परेड का होणार नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Republic Day Parade  tableaus
Republic Day Parade tableausreddiff
Published On

Republic Day Parade 2024:

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रत्येक राज्याची विशेषता सांगणाऱ्या शोभारथाची परेड केली जाते. परंतु या शोभारथावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. यंदा २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पंजाब आणि पश्चिम बंगालचे शोभारथ परेडमध्ये समाविष्ट होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.(Latest News)

शोभारथ निवडताना भेदभाव केला, असा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री (Chief Minister) भगवंत मान यांनी केला होता. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने शोभारथाची परेड का होणार नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. पंजाबचे शोभारथ हे या वर्षाच्या व्यापक थीमशी सुसंगत नसल्याने त्याचा समावेश केला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिन (Republic Day) परेड २०२४ साठी, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांसह ३० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी परेडमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या ३० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांपैकी दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये शोभारथ १५ ते १६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची निवड करण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की तज्ञ समितीच्या बैठकीत पहिल्या तीन टप्प्यात पंजाबच्या (punjab) शोभारथाच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला होता, परंतु बैठकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर पंजाबच्या शोभारथचा विचार करण्यात आला नाही. यावेळच्या परेडच्या व्यापक थीमशी सुसंगत नसल्यामुळे या शोभारथचा अधिक विचार करण्यात आला नाही, असं संरक्षण मंत्रालयाने (defenc Ministry) म्हटलं आहे.

तसेच पश्चिम बंगालच्या (west bengal) प्रस्तावावर तज्ज्ञ समितीने पहिल्या दोन फेऱ्याही घेतल्या. यामध्ये या गोष्टींचा विचार करण्यात आला. दुसऱ्या फेरीच्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या शोभारथाचा विचार झाला नाही. कारण बंगालचा शोभारथ देखील थीमनुसार नसल्याचे आढळून आले. \दरम्यान तज्ञ समितीने गेल्या काही वर्षांत, २०१७ ते २०२२ या ८ वर्षांत ६ वेळा प्रजासत्ताक दिन परेडसाठी पंजाब आणि पश्चिम बंगालचे शोभारथ निवडली आहेत. २०१६,२०१७,२०१९,२०१२१, २०२३ या मागील ८ वर्षात ५ वेळा या दोन्ही राज्यांचे शोभारथ शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.

पंजाबचा शोभारथ यावेळी परेडमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री मान यांनी केंद्रावर टीका केलीय. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पंजाबचा शोभारथ २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लक्षात येत की, दिल्लीच्या मनात पंजाबविषयी किती विष आहे, हे दिसतं.

Republic Day Parade  tableaus
Maharashtra Chitrarath: महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावला दुसरा क्रमांक, साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्तीचे घडवले होते दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com