Maharashtra Chitrarath: महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावला दुसरा क्रमांक, साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्तीचे घडवले होते दर्शन

महाराष्ट्राने राजपथावर साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्तीचा जागर अशी थीम थरवण्यात आली होती. एकूण १७ राज्याच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग नोंदवला होता.
Maharashtra Chitrarath 2023
Maharashtra Chitrarath 2023Saamtv
Published On

शिवाजी काळे...

Maharashtra Chitrarath 2023: प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा दुसरा क्रमांक आला आहे. महाराष्ट्राने राजपथावर साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्तीचा जागर अशी थीम थरवण्यात आली होती. एकूण १७ राज्याच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तराखंड च्या चित्ररथाचा पहिला तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाचा तिसरा क्रमांक आला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Chitrarath 2023
Maharashtra politics: 'कायद्याने चिन्ह आम्हालाच मिळायला हवं...' अरविंद सावंत यांचे विधान; शिंदे गटावर केली टीका

काय होती महाराष्ट्राची थीम...

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची आंबाबाई मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धशक्क्तीपीठ या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या मंदिराची बांधकाम शैली देखील या चित्ररथांचे मुख्य आकर्षण होते.

अशी होती चित्ररथाची मांडणी...

चित्ररथाच्या मध्यभागी देवीचे गोंधळी संबळ, हलगी वाजवताना दाखवण्यात आले होते. संबळ आणि हलगी हे देवीच्या संबंधीत वाद्य दाखवण्यात आले होते. चित्ररथाच्या मध्यभागी महाराष्ट्राची लोककला दाखवताना पोतराजाला हलगी वाजवताना दाखवण्यात आले आहे. याशिवाय अराधीला देखील या चित्ररथावर दाखवण्यात आले होते.

Maharashtra Chitrarath 2023
Baba Ramdev News: आम्ही जर हत्यारं उपसली असती तर.., बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

दरम्यान, यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंती मध्ये पहिला क्रमांक मिळाला होता

१९७१ ते २०२३ या काळात महाराष्ट्राने ५२ वर्षाच्या काळात ३९ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे. यासाठी महाराष्ट्राला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com