Maharashtra politics: 'कायद्याने चिन्ह आम्हालाच मिळायला हवं...' अरविंद सावंत यांचे विधान; शिंदे गटावर केली टीका

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली असून न्यायालयीन लढाईत आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे..
Arvind Sawant, Latest Marathi News
Arvind Sawant, Latest Marathi NewsSaam tv
Published On

शिवाजी काळे...

Arvind Sawant: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फुटली होती. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये दोन गट पडले. सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन न्यायालयीन लढाई सुरू आहे.

याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली असून न्यायालयीन लढाईत आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (Arwind Sawant)

Arvind Sawant, Latest Marathi News
Baba Ramdev News: आम्ही जर हत्यारं उपसली असती तर.., बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

याबद्दल बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, मुळ शिवसेना पक्षाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे मिंदे गटाने काय सादर केले याला महत्व नाही, असे म्हणत एक आमदार असलेल्या पक्षातील आमदार गेला तर त्या पक्षप्रमुखाने काय करायचे असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराला मतदान करण्यात आले आहे, त्यामुळे न्याय हा मूळ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे,शिंदे गटासोबत जी महाशक्ती आहे ती संविधानाची चिरफाड करत आहे, त्यामुळे कायद्याचे राज्य राहिले नाही," अशा शब्दात अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला.

Arvind Sawant, Latest Marathi News
Bharat Jodo Yatra : 'जम्मू कश्मीरने मला हँड ग्रेनेड नाही, प्रेम दिले', राहुल गांधींचं समाप्तीचं भाषण

तसेच, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष आहे. ते नाव आणि चिन्ह पुन्हा आम्हाला मिळायलं हव, कोणी आमदार गेला म्हणून पक्ष जाऊ शकत नाही.आत्ता पर्यंत झालेले वाद विवाद लेखी देण्यात आले आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिणापत्र दिले आहेत. आम्हाला न्याय द्यायला हवा असे सांगत चिन्ह देताना शंभुराजे देसाई कुठे पक्षात होते," असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com