जगभरात नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे. भारतातही नववर्षानिमित्त लोकांमध्ये जल्लोष सुरू आहे. लोकं त्यांचे मित्र आणि कुटुंबासह हा आनंद साजरा करत आहेत. भारतात लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी उत्सुक आहेत. पर्यटनस्थळ आणि देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलीय. (Latest News)
मुंबईत नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी मुंबईची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई शहरात १३ हजाराहून अधिक पोलीस तैनात असणार आहेत. नागरीकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे साजरा करता यावा, याकरीता मुंबई पोलीस दलाकडून मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे. याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
लोणावळ्यात येऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा असते. टायगर पॉईंटसह इतर अन्य पॉईंटमध्ये असलेल्या हॉटेलमधील व्यंजनावर ताव मारण्याकरिता पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन नगरीत दाखल झालेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री बाराच्या पुढे हॉटेल बंद करणे अनिवार्य आहे, तसेच मोठ्या आवाजात डीजेच्या तालावर धांगडधिंगा न घालण्याच्या सूचना लोणावळा पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक यांना दिल्या आहेत.
शिर्डीतील साई मंदिर परिसरात तोबा गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली असून साई मंदिर परिसरात भाविकांनी तोबा गर्दी केली आहे... साई समाधीला आकर्षक फुलांची सजावट आणि समाधी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मरीन ड्राईव्ह येथे नागरिकांची गर्दी
नवीन वर्षाचे मोठ्या उत्सवात मरीन ड्राईव्ह येथे साजरा करण्यात आले आहे..मोठया संख्येने आज नागरीक मरीन ड्राईव्ह येथे साजरा करण्यासाठी आले. ठाणे आणि नाशिक येथील नागरिक देखील नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आले आहेत.
हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी
दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील प्रसिद्ध प्राचीन हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. २०२३च्या शेवटच्या दिवशी अयोध्येतील सरयू घाटावर शेवटची संध्याकाळची आरती झाली.
न्यूझीलंडच्या स्काय टॉवरवर आतिषबाजी
न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर रोषणाई आणि आतिषबाजीने देश उजळून निघाला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये हार्बर ब्रिजवर फटाक्यांच्या आतिषबाजी पाहायला मिळाली.
ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाची सुरुवात
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात फटाक्यांच्या आतीषबाजीत करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.