बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावार देखील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. रिलीजच्या 40 दिवसांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम दाखवत चांगले कलेक्शनही करत आहे.
अशामध्ये ‘ॲनिमल’ चित्रपट न पाहिलेल्या आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकीट दरावर खास ऑफर आणली आहे. आता तुम्ही अॅनिमल चित्रपटाचे तिकिटे खूपच स्वस्त दरामध्ये खरेदी करून चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. फक्त १०० रुपयांमध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहायची संधी मिळणार आहे. हे तिकीट १०० रुपयांमध्ये कसं आणि कुठून खेरदी करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत...
'अॅनिमल'च्या दमदार यशामुळे चित्रपटाचे निर्माते आणि स्टारकास्ट खूपच आनंदी आहे. मागच्या शनिवारी मुंबईत या चित्रपटाची सक्सेस पार्टीही आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये संपूर्ण स्टारकास्ट सहभागी झाली होती. आता निर्मात्यांनी 'अॅनिमल'च्या तिकिटांवर मोठी ऑफर जाहीर केली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 300 रुपयांवरून 100 रुपये केली आहे. म्हणजेच फक्त 100 रुपयांमध्ये तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
'अॅनिमल'च्या निर्मात्यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर 100 रुपयांमध्ये या चित्रपटाचे तिकीट कसे मिळवायचे याची माहिती शेअर केली आहे. 'Animal' चे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आता फक्त 100 रुपयांमध्ये तुमचा आवडता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहा. तिकिट बुक करण्याची लिंकही देण्यात आली आहे. https://linktr.ee/animal_booktickets…'
रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2023 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले असून 'अॅनिमल'ने देशांतर्गत मार्केटमध्ये 550.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरव्यति् रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.