World Richest Person Saam Tv
बिझनेस

World Richest Person: जगातील श्रीमंतांच्या यादीत उलटफेर; एलॉन मस्क यांची तिसऱ्या स्थानी घसरण, पहिल्या-दुसऱ्या स्थानी कोण?

World Richest Person List: जगातील श्रीमंतांच्या यादीत उलटफेर झाली आहे. एलॉन मस्क यांची तिसऱ्या स्थानी घसरण झालीय, पहिल्या-दुसऱ्या स्थानी कोण आहे? हे आपण पाहू या.

Rohini Gudaghe

Richest Person In World

टेस्ला, स्पेसएक्स आणि X प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं स्थान गमावलं आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आले आहेत. X प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी मस्क यांच्यावर थकबाकी न भरण्यासह अनेक आरोपांसह खटला भरल्याची बातमी आली होती. (latest accident news)

आता आज बुधवारी एलॉन मस्क यांना आणखी एक धक्का बसला (World Richest Person) आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची एका स्थानावर घसरण झाली आहे. या यादीत फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) दुसऱ्या स्थानावर तर एलॉन मस्क तिसऱ्या स्थानावर आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ॲमेझॉनचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मंगळवारी एलॉन मस्कच्या संपत्तीत $5.29 अब्जची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 192 अब्ज डॉलरवर घसरली आहे. त्याच वेळी, बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले (World Richest Person List) आहेत. त्याची एकूण संपत्ती सध्या 195 अब्ज डॉलर्स आहे.

सध्या ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 197 अब्ज डॉलर्स आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर (Richest Person In World) आहे. त्यांची एकूण संपत्ती $176 अब्ज आहे. यानंतर बिल गेट्स 149 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सध्या केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींची एकूण संपत्ती सध्या 114 अब्ज डॉलर्स आहे. मंगळवारी त्याची एकूण संपत्ती $535 दशलक्षने घसरली होती.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) 104 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 13 व्या स्थानावर आहेत. मंगळवारी त्याची एकूण संपत्ती $341 दशलक्षने वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

SCROLL FOR NEXT