Anant Ambani Watch Price
Anant Ambani Watch Price Saam tv

Anant Ambani Watch Price : अनंत अंबानी यांचं घड्याळ पाहून मार्क झुकरबर्ग यांची पत्नी पडली चाट; घड्याळाची किंमत जाणून व्हाल थक्क

Anant Ambani Viral Video : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची जोरदार चर्चा होत आहे. जगभरातील लोकांची या शाही सोहळ्यावर नजर आहे.
Published on

Anant Ambani pre Wedding :

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची जोरदार चर्चा होत आहे. जगभरातील लोकांची या शाही सोहळ्यावर नजर आहे. तीन दिवसांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची रविवारी अखेरचा दिवस होता. या सोहळ्याला जगभरातील प्रतिष्ठित लोकांनी झाडून हजेरी लावली. याच सोहळ्यातील अनंत अंबानी यांच्या हातातील घड्याळाची जोरदार चर्चा आहे. (Latest Marathi News)

गुजरातच्या जामनगरमधील प्री-वेडिंग सोहळ्यातील एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी आणि आकाश अंबानी आणि फेसबुकचे मालक मार्क झुररबर्ग चर्चा करताना दिसत आहेत. मार्क आणि त्यांची बायको प्रिन्सिला चान या अनंत अंबानी यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. यावेळी मार्क यांची पत्नी प्रिन्सिला या अनंत अंबानी यांच्या घड्याळाचं कौतुक करताना दिसत आहेत.

Anant Ambani Watch Price
Anant-Radhika Pre wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये 'खान्स'चा जलवा, सलमान-शाहरुख-आमिरचा 'नाटू-नाटू'वरील डान्स VIDEO Viral

एका मिडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी यांच्या घड्याळाची किंमत १४ कोटी ते १८ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. 'इंडियन हॉरोलॉजी' या इन्स्टाग्राम पेजवरून या घडाळ्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या घडाळ्यात अनेक प्रकारचे फिचर्स आहेत.

Anant Ambani Watch Price
सचिनपासून ते धोनीपर्यंत या दिग्गज खेळाडूंची Anant Ambani- Radhika Merchant यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

सोशल मीडिया व्हायरल होतोय व्हिडिओ

अनंती अंबानी यांच्या घडाळ्याची चौकशी करतानाचा प्रिन्सिला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती किती?

मार्क झुकरबर्ग यांनी अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी मार्क यांची पत्नी प्रिन्सिला देखील भारतात आल्या आहेत. मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती १७६.१ बिलियन डॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मार्क झुकरबर्ग हे चौथ्या स्थानावर आहेत. तर भारतासहित आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमांकवारीत ९ व्या स्थानावर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com