Elon Musk News in Marathi : जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला; एलॉन मस्क यांचा जपानी नागरिकांना सल्ला

Elon Musk News : 'जपानने लवकर बदललं पाहिजे. अन्यथा त्यांचं अस्तित्व लवकरच नष्ट होण्याची शक्यता आहे, अशा आशयाची पोस्ट करत एलॉन मस्क यांनी मोठी भीती वर्तवली आहे.
Elon Musk
Elon MuskSaam Digital
Published On

Elon Musk Latest News :

ट्विटर आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. 'जपानने लवकर बदललं पाहिजे. अन्यथा त्यांचं अस्तित्व लवकरच नष्ट होण्याची शक्यता आहे, अशा आशयाची पोस्ट करत एलॉन मस्क यांनी मोठी भीती वर्तवली आहे. एलॉन मस्क यांच्या पोस्टनंतर अनेक लोक चकीत झाले आहेत. (Latest Marathi News)

एलॉन मस्क यांनी जपानच्या लोकसंख्येच्या घसरणीवर मोठं वक्तव्य केलं आहे. जपानमधील लोकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घाला. त्यांनी पृथ्वीवरील लोकसंख्या वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असं ते म्हणाले. मीडिया रिपोर्टनुसार, जपानमध्ये लोकसंख्या घसरणीचा मोठा धोका समोर येत आहे. जपानमधील जन्मदर सातत्याने घसरत आहे.

Elon Musk
Mobile Theft Cctv | पायी चालणाऱ्या तरुणीचा फोन एका क्षणात पळवला! घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल..

एलॉन मस्कने पोस्टमध्ये म्हटलं की?

जपानमध्ये जन्मदरात घसरण पाहायला मिळत आहे. जन्माला येणाऱ्या दोनहून अधिक मुलांचा मृत्यू होत आहे. १२५ मिलियन लोकसंख्येसाठी प्रत्येक वर्षी दहा लाख जणांचा मृत्यू होणे चांगले नाही.

एलॉन मस्कचं म्हणणं काय?

जपानमध्ये जन्मदरात घसरण पाहायला मिळत आहे. जन्माला येणाऱ्या दोनहून अधिक मुलांचा मृत्यू होत आहे. १२५ मिलियन लोकसंख्येसाठी प्रत्येक वर्षी दहा लाख जणांचा मृत्यू होणे चांगले नाही.

Elon Musk
Mobile Screen Guard: स्मार्टफोनसाठी स्क्रीनगार्ड वापरत असाल तर सावध व्हा; होऊ शकतं मोठं नुकसान

एका एक्स युजरने म्हटलं आहे की, 'दक्षिण कोरिया जपानचा पराभव करू शकतो'. आणखी एकाने म्हटलं की, 'यूरोपमध्येही जन्मदर कमी आहे. यूरोप बदलला नाही, तर जपानच्या आधी त्या देशाचं अस्तित्व नष्ट होईल'. दुसऱ्याने म्हटलं आहे की, 'मला पूर्ण विश्वास आहे की, असं काही होणार नाही'. एलॉन मस्कच्या पोस्टनंतर जगभरात जपानच्या लोकसंख्येविषयी चर्चांना उधाण आलं आहे. या विषयावर कोट्यवधी युजर प्रतिक्रिया देत आहेत. या समस्येसाठी जपान सरकारकडून काय पाऊल उचलले जाईल हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com