देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी सध्या लग्नसराई सुरू आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अर्थात उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या कपलच्या लग्नाकडे लागले आहे. या कपलच्या प्री-वेडिंग सिरेमनीला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. या कपलच्या प्री-वेडिंग फक्शनची सुरूवात अन्नसेवाने झाली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विवाह सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंट यांनी रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात अन्नसेवा केली. संपूर्ण अंबानी कुटुंबाने स्वतःच्या हाताने लोकांना जेवण वाढले. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने यावेळी नागरिकांशी गप्पा देखील मारल्या. ऐवढच नाही तर राधिकाची आजी आणि आई-वडिलांनी देखील जेवण वाढले. या अन्नसेवामध्ये मोठ्यांसख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. जवळपास ५१ हजार स्थानिक नागरिकांनी पारंपारिक गुजराती जेवणाचा आनंद घेतला. ही अन्नसेवा पुढच्या काही दिवस चालणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सिरेमनीसाठी स्थानिक नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने अन्नसेवा आयोजित केली आहे. भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात चार चाँद लावले. अंबानी कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या अन्नसेवा कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंबानी कुटुंबात अन्नसेवेची परंपरा जुनी आहे. अंबानी कुटुंबीय शुभकार्याच्या वेळी अन्नसेवा देतात. कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असतानाही अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवला. कौटुंबिक परंपरेला पुढे नेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीची कार्ये अन्नसेवेसोबत सुरू केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.