Good News! Deepika Padukone आणि Ranveer Singh होणार आई-बाबा, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म

deepika padukone Pregnancy Announcement: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत या कपलने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Deepika-Ranveer
Deepika-Ranveer Saam Tv

Deepika Padukone Pregnant:

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत या कपलने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. घरी नवा पाहुणा येणार असल्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातील सर्व सदस्य खुश आहेत. सध्या दीपिका आणि रणवीरवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दीपिका पदुकोण प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण दीपिका आणि रणवीरकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. या फक्त चर्चा आहेत असे अनेकांना वाटत होते. पण अखेर आज या कपलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले. दीपिका आणि रणवीरने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लहान मुलांची खेळणी, कपडे, शूज, फुगे दिसत आहेत. या फोटोच्या मधोमध सप्टेंबर २०२४ असे लिहिले आहे. याचाच अर्थ सप्टेंबर महिन्यामध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे.

दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार हे ऐकण्यासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक होते. अखेर आज या कपलने आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली. ही गुड न्यूज कळताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सध्या चाहत्यांकडून या कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसंच अनेक सेलिब्रिटींनी देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिती सेनॉनने दीपिकाच्या पोस्टवर सर्वात आधी पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाच्या पोस्टवर कमेंट करताना क्रितीने लिहिले की, 'ओएमजी, तुम्हा दोघांचे अभिनंदन.' या कमेंट्समध्ये क्रितीने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

दीपिका पदुकोण प्रग्नेंट असल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली होती जेव्हा तिने लंडनमध्ये पार पडलेल्या ७७ व्या बाफ्टा अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. या अवॉर्ड शोमध्ये तिने सुंदर साडी नेसली होती. यावेळी ती बेबी बंप लपवताना दिसली होती. त्यामुळे दीपिका लवकरच आई होणार असल्याचे म्हटले जात होते. आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. कारण दीपिका पदुकोणने स्वत:च आई होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Deepika-Ranveer
शुभ मंगल सावधान! Pooja Sawant आणि Siddhesh Chavan अडकले विवाहबंधनात, लग्नानंतरचा पहिला VIDEO आला समोर

दरम्यान, दीपिका पदुकोनने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. हे कपल सर्वांचे आवडते कपल आहे. या कपलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. 'गोलियों की रासलीला: रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी या दोघांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'गोलियों की रासलीला: रामलीला' या चित्रपटानंतर, 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', '83' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.

Deepika-Ranveer
Jaya Bachchan: हिंमत असेल तर समोर येऊन बोलून दाखवा, जया बच्चन पुन्हा एकदा ट्रोलर्सवर भडकल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com