Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! आधी डॉक्टर झाली मग केली UPSC क्रॅक; IPS नवजोत सिमी यांचा प्रवास

Success Story of IPS Dr Navjot Simi: नवजोत सिमी यांनी आधी डॉक्टर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे असते. परंतु यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही व्यक्ती यश मिळवू शकतो. असंच काहीसं आयपीएस नवजोत सिमी यांनी दाखवून दिले.

नवजोत सिमी या आयपीएस अधिकारी आहेत. त्या नेहमीच चर्चेत असतात. ब्युटी विथ ब्रेनचं त्या उत्तम उदाहरण आहे. त्यांचे सोशल मीडियावरदेखील लाखो फॉलोवर्स आहेत. डॉ. नवजोत सिमी यांचा जन्म पंजाबमधील गुरुदास येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पाखोवाल येथील मॉडल पब्लिक स्कूलमध्ये झाले.

नवजोत सिमी यांनी बाबा जसवंत सिंह डेंट कॉलेज अँड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून डेंटल सर्जरीमध्ये डिग्री प्राप्त केली होती. डॉक्टर झाल्यानंतर त्यांना त्या गोष्टीत फार रस उरला नाही. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. २०१६ साली पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली.

दुसऱ्या प्रयत्नात नवजोत सिमी यांना यश मिळालं. त्यांनी ७३५ रँक मिळवली. आयपीएस नवजोत सिमी यांना पहिल्यांदा बिहार कॅडर मिळाले होते.त्यानंतर त्या एसपी म्हणून कार्यरत झाल्या. नवजोत सिमी या त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. त्यांचे सोशल मीडियावर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. नवजोत सिमी यांना आयएएस तुषार सिंगला यांच्याशी लग्न केले. त्यांनी तुषार सिंगला यांच्या ऑफिसमध्येच लग्न केले. लग्नाचे प्लानिंग करण्यासाठी वेळ नसल्याने त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT