August Month Holiday Saam Tv
बिझनेस

August Month Holiday: फिरायला जायचा प्लान करताय? ऑगस्ट महिना ठरेल बेस्ट;दोन लाँग वीकेंड अन् ५ दिवस सलग सुट्ट्या मिळणार

Siddhi Hande

ऑगस्ट महिना लवकरच सुरु होणार आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन या सणांना सुट्ट्या असतात. या महिन्यात कर्मचाऱ्यांना अनेक सुट्ट्या मिळतात. जर तुम्हीही सुट्ट्यांची वाट पाहत असाल आणि फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ऑगस्ट महिन्यात दोन लाँग वीकेंड आहे. या वीकेंडला तुम्हाला ५दिवसांची सुट्टी मिळू शकते. ही सुट्टी कशी मिळणार आहे ते जाणून घ्या.

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी ही असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात दोन लाँग वीकेंड आहेत. १५ ऑगस्टला सर्वांना सुट्टी असते. यावर्षी १५ ऑगस्टला गुरुवार आहे. त्यामुळे गुरुवारी सुट्टी, शुक्रवारी तुम्ही रजा घेऊ शकता. त्यानंतर शनिवार आणि रविवार वीकेंड आहे. त्यानंतर पुन्हा सोमवार १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनानिमित्त अनेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असतात. त्यामुळे तुम्हाला ५ दिवसांचा लाँग वीकेंड एन्जॉय करता येईल.

लाँग वीकेंडची लिस्ट

१५ ऑगस्ट गुरुवार- स्वातंत्र्य दिनाची सुट्टी

१६ ऑगस्ट शुक्रवार- तुम्ही सुट्टी घेऊ शकतात

१७ ऑगस्ट शनिवार- वीकेंड

१८ ऑगस्ट रविवार- कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी

१९ ऑगस्ट सोमवार- रक्षाबंधन सुट्टी

ऑगस्ट महिन्यात आणखी तीन दिवस सलग सुट्ट्या मिळणार आहे. या महिन्यात २४ ऑगस्टला शनिवारी, २५ ऑगस्टला रविवार आहे तर २६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. त्यामुळे तुम्हाला सुट्टी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही नक्कीच फिरायला जायचा प्लान करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT