Shreya Maskar
रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे, असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. तर मग आजच्या नाश्त्याल कुरकुरीत मूग डाळीचे वडे बनवा. ही रेसिपी सर्वांना खूप आवडेल.
मूग डाळ वडे बनवण्यासाठी मुगाची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण , आलं , धने पूड, जिरे पूड , कांदे, लिंबाचा रस कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
मूग डाळ वडे बनवण्यासाठी मुगाची डाळ २ ते ३ वेळा चांगली स्वच्छ धुवून ४ ते ५ तास ती पाण्यात भिजत ठेवा. जर तुम्ही मूग डाळ भिजवायची विसरून गेला असाल तर, गरम पाण्यात मूग डाळ ५-१० मिनिटे ठेवून द्या.
मूग डाळीमधील पाणी काढून मिक्सरला वाटून घ्या. यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं घालून जाडसर पेस्ट तयार करा.
बारीक झालेल्या पीठामध्ये जिरे पूड, धने पूड, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. आता तयार पीठ चांगले मुरण्यासाठी 5-10 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात छोटे छोटे मुग डाळीचे वडे खरपूस तळून घ्या. वडे तळताना गॅस कमी आचेवर ठेवा, जेणेकरून पीठ जळणार नाही.
तुम्ही गरमागरम चहासोबत कुरकुरीत मूग डाळीचे वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. तसेच पुदिन्याच्या चटणीसोबत मूग डाळ वड्यांची चव आणखी वाढले.
मूग डाळीच्या वड्यांना थोडे चटपटीत करायचे असेल तर यात चीड, पेरी पेरी मसाला आणि शेजवान सॉस नक्की टाका.