Shreya Maskar
कांजी वडा हा प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर भारतातील पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा.
कांजी बनवण्यासाठी मोहरी पावडर, हळद, मिरची पावडर, मीठ, पाणी, काळे मीठ, हिंग इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
वडे बनवण्यासाठी मूग डाळ, हिरव्या मिरच्या, आले, जिरे, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
कांजी बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी, मोहरी पावडर, हळद, मिरची पावडर, काळे मीठ, साधे मीठ आणि हिंग घालून चांगले ढवळून घ्या आणि झाकून ठेवा.
१ दिवस कांजी उष्ण ठिकाणी ठेवल्यास त्याला आंबट स्वाद येतो.
दुसरीकडे मिक्सरमध्ये भिजवलेली मूग डाळ, हिरव्या मिरच्या, आले आणि जिरे बारीक वाटून घ्या. त्यात मीठ घालून छान मिक्स करा. त्यानंतर चांगली कणिक मळा
गरम तेलात छोटे-छोटे वडे सोडून गोल्डन फ्राय करा. तयार वडे आधी कोमट पाण्यात ५ मिनिटे भिजवा आणि नंतर पाण्यातून काढा.
पाण्यातून काढलेले वडे आता कांजीमध्ये टाका आणि २-३ तास चांगले भिजू द्या. आंबट-तिखटसर कांजी वडे थंडगार सर्व्ह करा.