Shreya Maskar
होळीला खास कलरफुल ब्रेकफास्ट बनवा. हेल्दी बीटरूट ढोकळा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे तुमचे पोट भरेल आणि सणाची मजा वाढेल.
बीटरूट ढोकळा बनवण्यासाठी बीटरूट, बेसन, पाणी, मीठ, साखर, इनो, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
बीटरूट ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम बीटरूट कापून त्यामध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा. पेस्ट जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन आणि बीटरूट प्युरी घालून चांगले मिक्स करा. मिश्रणाचा गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. सतत ढवळत रहा. .
या पेस्टमध्ये मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण मिक्स करा. आता यात इनो मिक्स करा. म्हणजे ढोकळा छान फुलेल आणि मऊ होईल.
एका भांड्याला तेल लावा, त्यात सर्व मिश्रण पसरवून घ्या. ते भांडे कुकरमध्ये ठेवा आणि १५-२० मिनिटे ढोकळा चांगला वाफवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून तडका तयार करा. ढोकळ्यावर गरमागरम तडका द्या.
तयार ढोकळ्याचे छोटे छोटे तुकडे करून पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. हा चटपटीत नाश्ता सर्वांना खूप आवडेल.
NEXT : होळीला गोड खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा खानदेशी स्टाइल डुबुक वड्यांचा झणझणीत रस्सा