Shreya Maskar
यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. शिमग्यासाठी लोक कोकणात जाताना दिसत आहे. होळीला काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर डुबुक वडे बनवा.
डुबुक वडे ही भारतातील महाराष्ट्रातील खानदेशातील एक पारंपरिक डिश आहे. ही झणझणीत रस्सा भाजी भाकरीसोबत चांगली लागते.
डुबुक वडे बनवण्यासाठी बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, कांदा-लसूण मसाला, पाणी, तेल, काळी मिरी, खडे मसाले, चणाडाळ, आलं, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर, कांदा, मीठ इत्यादी साहित्य लागते.
डुबुक वडे बनवण्यासाठी बाऊलमध्ये बेसन पीठ घ्या. त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि बारीक लसूण मसाला घाला. नंतर त्यामध्ये पाणी घालून बॅटर बनवून घ्या. हे बॅटर फार पातळी आणि फार घट्ट करू नका.
मसाला बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल, काळी मिरी, लवंग, धणे पावडर, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, मीठ आणि सुकं खोबरं चांगले भाजून घ्या. मिश्रणात गरम मसाला आणि पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हळद आणि कांदा-लसूण मसाला घाला. मसाला चांगल्या परतल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकून मिक्स करा.
मसाल्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर बेसनाचे पीठाचे छोटे गोळे करून रस्स्यामध्ये सोडा.
शेवटी भाजीमध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून २-३ मिनिटे भाजी उकळवा. अशाप्रकारे गावरान स्टाइल डुबुक वड्याचा झणझणीत रस्सा तयार झाला.