देशात इलेक्ट्रिक स्कूटरचा सेगमेंट आता इतका मोठा झाला आहे की, याचे सेकंड हँड मार्केटही विस्तारत आहे. काही महिने चालवल्यानंतर आता लोक त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विकायला लागले आहेत. चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किमान 1 लाख रुपये असते. पण प्रत्येकजण इतकी महागडी स्कूटर घेऊ शकत नाही. अशातच सेकंड हँड इलेक्ट्रिक स्कूटर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
अशा अनेक वेबसाइट्स आहेत जिथे चांगली मॉडेल्स कमी किमतीत उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला EMI चा पर्याय देखील येथे मिळतो. पण पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशातच सेकंड हँड इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना काय काळजी घ्यावी, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जुनी इलेक्ट्रिक स्कूटर काळजीपूर्वक तपासा. स्कूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित तपासा. याशिवाय स्कूटर चार्ज करून पहा. यावरून तुम्हाला स्कूटरच्या स्थितीची कल्पना येईल.
तुम्ही खरेदी करणार असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एकदा टेस्ट ड्राइव्ह करून पाहा. ब्रेक किंवा सस्पेन्शनमध्ये काही अडचण येत आहे का, हेही पाहा.
तुम्ही खरेदी करणार असलेल्या सेकंड हँड इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्व्हिस रेकॉर्ड नक्की चेक करा. असे केल्याने तुम्हाला स्कूटरबद्दल बरेच काही कळेल, जे भविष्यातही तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय स्कूटरची बॉडी आणि इतर भागही तपासा.
जुन्या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा, तसेच विम्याची कागदपत्रे क्रॉस चेक करा. जर विम्याची मुदत संपली असेल तर त्याबद्दल स्कूटर मालकाशी बोला. विम्याची कागदपत्रे तुमच्या नावावर हस्तांतरित केली आहेत का, याची देखील खात्री करा.
स्कूटरवर कोणते लोन सुरु आहे का, हेही तपासा. जुनी स्कूटर लोन घेऊन खरेदी केली असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC ) घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही एक चांगली जुनी इलेक्ट्रिक स्कूटर सहज खरेदी करू शकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.