Honda Amaze CNG लवकरच होणार लॉन्च, शोरूममध्ये दिसली पहिली झलक; जाणून घ्या फीचर्स

Upcoming Cars Launch in India 2024: Honda Cars India लवकरच आपली सेडान कार अमेझ सीएनजी टँकसह लॉन्च करू शकते.
Honda Amaze CNG लवकरच होणार लॉन्च, शोरूममध्ये दिसली पहिली झलक; जाणून घ्या फीचर्स
Honda Amaze CNGSaam TV
Published On

New CNG Car Launch in India: भारतात सीएनजी कारच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. यातच सीएनजी कारच्या बाबतीत नवनवीन शोध लागत आहेत. सीएनजी कार आता पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देत आहेत. एवढेच नाही तर आता एका मोठ्या सीएनजी टाकीच्या जागी दोन लहान सीएनजी टँक येत आहेत, त्यामुळे कारमध्ये अधिक बूट स्पेस मिळतो. सध्या देशात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईच्या सीएनजी गाड्या खूप पसंत केल्या जात आहेत.

आता याच सेगमेंटमध्ये Honda Cars India देखील या प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. कंपनी लवकरच आपली सेडान कार अमेझ सीएनजी टँकसह लॉन्च करू शकते, असं बोललं जात आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Honda Amaze CNG लवकरच होणार लॉन्च, शोरूममध्ये दिसली पहिली झलक; जाणून घ्या फीचर्स
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक येतेय, 250cc इंजिनसह मिळणार जबरदस्त मायलेज

Honda Cars India ने अधिकृतपणे त्यांची कोणतीही CNG कार लॉन्च केलेली नाही. मात्र निवडक Honda डीलरशिपवर कोणत्याही वॉरंटीशिवाय CNG किट दिले जात आहेत. Honda डीलरशिपवर CNG किटसह Amaze ऑफर केली जात आहे. ग्राहकही या कारला पसंती देत ​​आहेत.

ज्यांच्याकडे अमेझ आहे ते लोक त्यांच्या कारमध्ये सीएनजी किट बसवू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या होंडा शोरूमशी संपर्क साधू शकता. इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत सीएनजी कार अजूनही किफायतशीर ठरत आहेत. कारण या कार स्वस्त आहेत असून सीएनजी भरण्यासाठी कमी वेळ लागतो.

Honda Amaze CNG लवकरच होणार लॉन्च, शोरूममध्ये दिसली पहिली झलक; जाणून घ्या फीचर्स
Bajaj Freedom 125 CNG: बजाजची पहिली CNG बाईक खरेदी केली पाहिजे का? जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी

Honda Amaze मध्ये CNG किट बसवल्यानंतर बूट स्पेस नक्कीच कमी झाली आहे, कारण CNG टाकी 60 लिटरची आहे. पण एकदा टाकी भरली की, तुम्ही सहज लांब अंतरावर जाऊ शकता. सूत्रानुसार, Honda लवकरच फॅक्टरी फिटेड CNG सह 3rd जनरेशन Amaze लॉन्च करू शकते. नेक्स्ट जनरेशन अमेझची टेस्ट सुरू आहे, जी अनेक मोठ्या बदलांसह येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com