Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Petrol Diesel Rate 19th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.
Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Rate TodaySaam Tv
Published On

राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 84 डॉलरवर विकले जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ८४.५५ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइस ८२.१० डॉलरवर विकले जात आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate Today
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

आज नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३५ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Rate Today
Second hand EV: जुनी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणं पडू शकतं महाग; या 5 गोष्टी जाणून घ्या, फायद्यात राहाल!

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहे. पेट्रोल डिझेलवरील वॅट कर कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर ६५ पैशांनी कमी झाले होते. पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.३० रुपये प्रति लिटर आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.१२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Rate Today
Stock Market : शेअर बाजाराची ऐतिहासिक घौडदौड; पहिल्यांदा सेन्सेक्स 81000 पार, तर निफ्टीनेही घेतली उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com