Matheran Tourism : धडकी भरवणारी दरी आणि घनदाट जंगल, माथेरानच्या 'या' ट्रेकसमोर स्वित्झर्लंडही फिके पडेल

Shreya Maskar

माथेरान

गार्बेट पठार हे माथेरानच्या नैऋत्य दिशेला समुद्रसपाटीपासून सुमारे २६२५ फूट उंचीवर वसलेले एक अत्यंत निसर्गरम्य आणि लोकप्रिय पावसाळी ट्रेकिंग स्पॉट आहे. तुम्ही येथे वीकेंड प्लान करू शकता.

Matheran | yandex

गार्बेट पठार

गार्बेट पठारावरून हिरवेगार डोंगर, धबधबे, मोरबे धरणाचे विहंगम दृश्य दिसते. तुम्ही येथे सुंदर फोटोशूटच आनंद घेऊ शकता. येथील सौंदर्य पाहताच तुमचा सर्व ताण निघून जाईल.

Garbet Plateau | yandex

ट्रेकिंगचा मार्ग 1

गार्बेट पठार ट्रेक हा मुंबई-पुण्यापासून जवळ, भिवपुरी येथून सुरू होणारा ३-४ तासांचा मध्यम स्वरूपाचा एक दिवसाचा थरारक ट्रेक आहे.

Trekking | google

ट्रेकिंगचा मार्ग 2

गार्बेट पठारावर जाण्यासाठी तुम्ही डिकसळ गावापासून देखील ट्रेक सुरू करू शकता. वाटेत तुम्हाला निसर्गाचे अद्भुत नजारे पाहायला मिळतील. जे पाहून तुमचा आठवड्याभराचा सर्व ताण निघून जाईल.

Garbet Plateau | yandex

कधी भेट द्याल?

गार्बेट पठार सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले एक निसर्गरम्य पठार आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते. वीकेंडला येथे पर्यटक गर्दी करतात.

Garbet Plateau | yandex

पर्यटन स्थळे

‌गार्बेट पठारावरून माथेरानचे पठार, प्रबळगड, चंदेरी किल्ला, पेब किल्ला आणि इर्शाळगड यांचे विहंगम दृश्य दिसते .

Garbet Plateau | yandex

कसे जाल?

भिवपुरी स्टेशनला उतरून तुम्ही डिकसाळ गावापर्यंत रिक्षाने किंवा बसने जाऊ शकता. त्यानंतर गार्बेट पठारपर्यंत ट्रेक करा.

Garbet Plateau | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Matheran | yandex

NEXT : खिशात फक्त ५०० रुपये अन् सुट्टी एकच दिवस? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' बेस्ट डेस्टिनेशन

Palghar Tourism | saam tv
येथे क्लिक करा...