ATM Rule Chanhge From 1st May 
बिझनेस

ATM Rule Change: मे महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना फटका; ATMमधून पैसे काढणे पडणार महागात

ATM Rule Chanhge From 1st May: एटीएममधून पैसे काढणं आता महागणार आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला आता शुल्क द्यावे लागणार आहे.

Bharat Jadhav

बॅकेच्या खात्यातून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर शु्ल्क आकारले जाणार आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासूनच एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली होती. हे शुल्क १ मे २०२५ पासून लागू होणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील अनेक बँक आपल्या नियमात बदल करत असतात. यात एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमाचाही समावेश आहे. जर तुम्ही तुमची होम बँक सोडून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला शुल्क भरावा लागतो. किंवा जर बॅलन्स चेक केला तरी ग्राहकाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल. १ मे पासून यात अजून वाढणार आहे.

किती शुल्क लागणार

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या प्रस्तावावर आधारित आरबीआयने नुकतेच शुल्क वाढवण्यास परवानगी दिली होती. वृत्तानुसार, आतापर्यंत जर ग्राहकांनी त्यांच्या घरच्या बँकेच्या एटीएमऐवजी दुसऱ्या नेटवर्क बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर त्यांना प्रत्येक व्यवहारावर १७ रुपये शुल्क द्यावे लागत होते, जे १ मे पासून १९ रुपये होणार आहे. तसेच तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये बॅलन्स चेक करत असाल तर त्यावर ६ रुपये शुल्क आकारले जात होते. जे आता वाढवून ७ रुपये केले जाणार आहे.

ग्राहकांच्या फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये. एटीएममधून तुम्ही ५ वेळा फ्रीमध्ये पैसे काढू शकतात. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर शुल्क भरावे लागेल. मेट्रो शहरांमध्ये ३ ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ५वेळा तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT