Bank Holiday: कामाची बातमी! मे महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; सुट्ट्यांची यादी वाचा

Bank Holidays In May 2025: मे महिन्यात बँका तब्बल १३ दिवस बंद असणार आहेत. सण आणि वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे बँका बंद असणार आहे. रिझर्व्ह बँकेने ही यादी जारी केली आहे.
Bank Holiday
Bank HolidaySaam Tv
Published On

मे महिना सुरु होणार आहे. मे महिन्यात बँकेच्या संबंधित काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी वाचून जा. मे महिन्यात बँकांना तब्बल १३ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे.मे महिन्यात अनेक सण असल्याने त्यासाठी तब्बल ७ दिवस बँका बंद असणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहे.

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यामुळे राज्यानुसार सुट्टी असणार आहे. दुसरा आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या संबंधित कोणतेही काम असेल तर सुट्ट्यांची यादी वाचून जा.

Bank Holiday
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

मे महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी

१ मे २०२५, गुरुवार

मे महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. मे दिवस यानिमित्त गोवा, आसाम, मणिपुर, केरल, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर, बिहार, गुजरात, कर्नाटक,तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणामध्ये बँका बंद असणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रात बँका बंद असणार आहेत.

४ मे २०२५, रविवार

रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.

८ मे २०२५

गुरु रविंद्र जयंतीनिमित्त दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि त्रिपुरा येथील बँका बंद असणार आहे.

१० मई २०२५

दुसऱ्या शनिवारी बँका बंद असणार आहे.

११ मे २०२५, रविवार

रविवारनिमित्त संपूर्ण देशात बँका बंद असणार आहेत.

१२ मे २०२५ सोमवार

बुद्ध पोर्णिमानिमित्त उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, सिक्किम, महाराष्ट्र येथे बँका बंद असणार आहे.

१६ मे, शुक्रवार

सिक्किम राज्य दिवसानिमित्त सिक्किममध्ये बँका बंद असणार आहे.

१८ मे २०२५, रविवार

वीकेंड असल्याने बँका बंद असणार आहे.

२४ मे २०२५

चौथ्या शनिवारी देशातील बँका बंद असणार आहे.

Bank Holiday
Bank Jobs: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; इंडियन बँकेत भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

२५ मे २०२५

रविवार असल्याने देशातील बँका बंद असणार आहे.

२६ मे २०२५, सोमवार

काजी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद असणार आहे.

२९ मे २०२५

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा येथे बँका बंद असणार आहे.

३० मे २०२५

श्री गुरु अर्जुन देवजी यांचा शहीद दिवस म्हणून काही राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.

Bank Holiday
RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! एटीएममधून पैसे काढणे आता महागणार; व्यवहार शुल्कात केली वाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com