भारतात सध्या इलेक्ट्रिक व्हेईकलची क्रेझ आहे. पर्यावरणपूरक या कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करत आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादनामध्ये एथर ही लोकप्रिय कंपनी आहे. एथर कंपनीची वाहनांची मागणी जास्तीत जास्त वाढणार आहे. या टू व्हीलर कंपनीच्या उत्पादनाचे तिसरे युनिट देशात स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ही माहिती देशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले आहे.
बिडकीन, छत्रपती संभाजी नगर इंडस्ट्रीयल सिटी (AURIC)येथे उभारण्यात येणाऱ्या उत्पादन युनिटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि बॅटरी पॅक तयार केला जाईल, असं एथर कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. एथर कंपनीच्या उत्पादन केंद्रासाठी २००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे ४००० लोकांना रोजगारनिर्मिती होणार आहे. महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात ही मोठी गुंतवणूक आहे. कंपनीचा हा प्लांट दरवर्षी १ दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक तयार केले जातील,असं त्यांनी म्हटलं आहे.
एथर एनर्जीचे होसूर आणि तमिळनाडू येथे प्लांट आहे. येथील एक प्लांट बॅचरी उत्पादनासाठी तर दुसरे वाहन असेंबलीसाठी आहे. परंतु छत्रपती संभाजी नगरमध्ये तयार होत असलेल्या प्लांटमध्ये बॅटरी पॅक आणि वाहने दोन्ही तयार केले जातील.या प्लांटमध्ये ४.३ लाख बॅटरी पॅक तर ४.२ लाख वाहने तयार करण्याची वार्षिक क्षमता आहे.
महाराष्ट्रात तयार होणाऱ्या या प्लांटमुळे एथर कंपनीच्या लॉजिस्टिक खर्चात कपात होणार आहे. तसेच ग्राहकांना वाहनांची झटपट डिलिव्हरी मिळण्यास मदत होते, असे कंपनीचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.