Ather Rizta: एथर लवकरच 'फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर' करणार लॉन्च, रिज्टा असेल नाव; किती मिळणार रेंज?

Ather Diesel Electric Scooter: एथर एनर्जी एका नवीन परवडणाऱ्या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहे. ज्याची गेल्या काही महिन्यांत अनेकदा टेस्ट करण्यात आली आहे.
Ather Diesel Electric Scooter
Ather Diesel Electric ScooterSaam Tv

Ather Diesel Electric Scooter:

एथर एनर्जी लवकरच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करणार आहे. कंपनी सध्या फक्त तीन ई-स्कूटर ऑफर करते. ज्यात 450S, 450X आणि अलीकडेच लॉन्च केलेली 450 Apex समाविष्ट आहे.

याशिवाय कंपनी एका नवीन परवडणाऱ्या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहे. ज्याची गेल्या काही महिन्यांत अनेकदा टेस्ट करण्यात आली आहे. 2024 च्या मध्यापर्यंत ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत येण्याची अपेक्षा आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ather Diesel Electric Scooter
Upcoming Electric SUV: फ्यूचरिस्टिक लूक, जबरदस्त रेंज; येत आहे महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार XUV.e9

रिज्टा असेल नाव?

अथरच्या या अपकमिंग ई-स्कूटरचे नाव 'रिज्टा' असण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे सांगितलं होतं की, कंपनी फॅमिली स्कूटरवर काम करत आहे. पुरवठादारांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी स्कूटरमध्ये मोठी स्पेस आणि शहराच्या कुटुंबासाठी एक व्यावहारिक पर्याय म्हणून स्कूटर सादर करण्यावर भर दिला.  (Latest Marathi News)

आगामी स्कूटर एथरच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 450 सिरीज प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळी असेल. जी त्याच्या परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय आहे. स्पाय शॉट्सनुसार, ही स्कूटर सध्याच्या Ather 450s पेक्षा पूर्णपणे भिन्न डिझाइनसह येईल. ज्यामध्ये रुंद, सपाट फ्लोअरबोर्ड आणि सीटसाठी मोठी जागा असेल.

Ather Diesel Electric Scooter
Cars Under 10 Lakh: 10 लाखांपेक्षा कमी किमतीत येतात या जबरदस्त हॅचबॅक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

दरम्यान, एथरचे उद्दिष्ट त्याच्या रेंजमध्ये विविधता आणण्याचे आहे. आगामी स्कूटर व्यावहारिकता आणि ग्राहकांच्या सोयीवर लक्ष केंद्रित करेल. एथरच्या पुरवठादारांपैकी एक Uno Minda Limited ने आगामी स्कूटर प्रकल्पाचा एक भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला.

Uno Minda येथे 2W सेगमेंटचे हेड मार्केटिंग Xabier Esquibel यांनी स्कूटरच्या विशेष वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ज्यामध्ये मोठ्या फॅमिली सीटचा समावेश आहे. सध्या एथर डिझेल ई-स्कूटरबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. लॉन्च केल्यावर ही स्कूटर बजाज, TVS, Hero MotorCorp, Ola इलेक्ट्रिक आणि Simple Energy सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com