Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Atal Pension Yojana: दररोज फक्त ₹७ गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा, वाचा कॅलक्युलेशन

Atal Pension Yojana Calculation: केंद्र सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरु केली आहे. अटल पेन्शन योजनेत तुम्ही दिवसाला फक्त ७ रुपये वाचवून ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

Siddhi Hande

दर महिन्याला पगार आपल्या खात्यात येतो. त्यामुळे महिन्याभराचा खर्च भागवता येतो. परंतु सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला आपल्या खात्यात पगार येणार नाही. त्यामुळे आपण आधीच बचत करायला हवी. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. जेव्हा योजनांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. तुम्ही भविष्यात आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आताच अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करा.

अटल पेन्शन योजनेचं कॅलक्युलेशन (Atal Pension Yojana Calculation)

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.ही सरकारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळते. या योजनेत दिवसाला ७ रुपये वाचवून तुम्ही ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

१८ ते ४० वयोगटातील नागरिक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पेन्शनवर सरकार स्वतः गॅरंटी देते.या योजनेत कमीत कमी २० वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी जर तुम्ही १८ व्या वर्षी गुंतवणूक केली तर ५००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत महिन्याला २१० रुपये जमा करायचे आहेत. म्हणजेच जेव्हा दिवसाला ७ रुपये गुंतवणार तेव्हा ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

जर तुम्ही महिन्याला ४२ रुपये गुंतवले तर १००० रुपयांची पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. पती आणि पत्नी दोघांच्या नावावर तुम्ही १० हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत ७ कोटींपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. या योजनेत तुम्हाला १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिट मिळणार आहे. तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांवर टॅक्स भरण्याची गरज नाही. या योजनेत तुम्ही तुम्हाला जेवढी पेन्शन हवी आहे त्या हिशोबाने गुंतवणूक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT