Apaar ID Saam Tv
बिझनेस

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार 'अपार आयडी'; १२ अंकी युनिक नंबर; फायदा काय?

Apaar ID For All Students: आता प्रत्येक विद्यार्थ्यांना अपार आयडी दिले जाणार आहे. अपार आयडीमध्ये एक युनिका १२ अंकी नंबर असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे.

Siddhi Hande

भारतीय शैक्षणिक कार्यपद्धतीत अनेक बदल केले आहेत. २०२० मध्ये शैक्षणिक धोरणात काही बदल केले आहे. या नवीन धोरणामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. याचसोबत मुलांना युनिक अपार आयडीदेखील दिले जाणार आहे.

अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे. याचसोबत विद्यार्थ्यांना डिजिलॉकरचा लाभ घेता येणार आहे. एक देश, एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून हे अपार कार्ड लाँच करण्यात आले आहे.

या नवीन अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहे.म्हणजेच जर तुमच्या मुलाला इतर कोणत्या शाळेत अॅडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागणार नाही. तुम्हाला फक्त अपार आयडीचा नंबर द्यावा लागणार आहे.

अपार आयडी ऑटोमेटेड अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. पूर्व प्राथमिक ते कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे. या कार्डवर १२ अंकी युनिक नंबर असणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व माहिती डिजिलॉकरमध्ये सेव्ह केली जाणार आहे.

अपार आयडी शाळा किंवा महाविद्यालये बनवणार आहे. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. यासठी पालकांशी संपर्क साधणार आहे. पालकांची परवानगी घेतल्यानंतरच ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आबे. क्लाउडवर आधारित तुमच्या कागदपत्रांची जागा उपलब्ध होणार आबे. यामध्ये सर्व सर्टिफिकेट आणि माहिती सेव्ह केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT