Bogus Police Certificate : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन एजंट विरोधात गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad News : वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना १२०० ते १६०० रुपयांत बनावट पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देत असल्याची माहिती समोर आली आहे.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : नोकरीच्या ठिकाणी लागण्यासाठी बऱ्याचदा पोलीस प्रशासनाचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मागितले जात असते. यासाठी काही कागतपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. असे बनावट सर्टिफिकेट तयार करून देणारी एक टोळी सक्रिय झाली होती. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दहशतवादी विरोधी शाखेने १२०० रुपयात बनावट पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्टिफिकेट तयार करून देण्यासाठी सक्रिय झालेले एजंट हे वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना १२०० ते १६०० रुपयांत बनावट पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देत असल्याची माहिती समोर आली आहे. यात आतापर्यंत या टोळीतील सदस्यांनी ४१ कामगारांना बनावट पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तयार करून दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

Pimpri Chinchwad News
Illegal Gas Cylinder Sale : व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री; पोलिसांची छापा टाकत कारवाई

अस्तित्वात नसलेल्या पोलीस स्टेशनचे सर्टिफिकेट 

वेगवेगळ्या खाजगी कंपन्यामध्ये काम करणारे वाहन चालक, सफाई कामगार, सुरक्षारक्षक आदी कामगारांना या टोळीकडून बनावट पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्यात आली आहेत. बनावट पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीने पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तर काही सर्टिफिकेट ही अस्तित्वातच नसलेल्या बोपखेल पोलिस स्टेशनची तयार करून दिली आहेत. 

Pimpri Chinchwad News
Beed Crime News : बीडमध्ये घरात घुसून गोळीबार; एकजण जखमी, जुन्या वादातून घटना

तीन जणांवर गुन्हा दाखल 

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात एजंट संदीप बनसोडे, सुनिल रोकडे आणि त्यांचा एक साथीदार अश्या तीन जणांच्या विरोधात दिघी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या बाबतचा तपास अद्याप चालू असून लवकरच सर्व माहिती समोर येईल; असं दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com