Illegal Gas Cylinder Sale : व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री; पोलिसांची छापा टाकत कारवाई

Pune News : गॅस सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. यात प्रामुख्याने गॅस सिलिंडरचा काळा बाजार करत जादा दराने विक्री केले जात असल्याचे देखील सुरू आहे. असाच प्रकार पुण्यामध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे.
Pune police
Pune policeSaam tv
Published On

सचिन जाधव 
पुणे
: घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध वापर सर्रासपणे होत असल्याचे नेहमीच पाहण्यास मिळत असते. तर पुण्यात देखील व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करण्याचा प्रकार सुरु असताना पुण्यात सिंहगड रोड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत गॅसच्या ७२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. 

गॅस सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. यात प्रामुख्याने गॅस सिलिंडरचा काळा बाजार करत जादा दराने विक्री केले जात असल्याचे देखील सुरू आहे. असाच प्रकार पुण्यामध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे. या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

Pune police
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं मिशन BMC; पालिकेवर फडकवणार महायुतीचा झेंडा, बैठकीत माजी नगरसेवकांना सांगितला विजयाचा प्लान, VIDEO

गस्त घालताना उघड आला प्रकार
सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील तपास पथकाने हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान वडगाव भाजी मंडई येथून जाणाऱ्या रस्त्यावर सीलबंद व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैधरीत्या विक्री होत असल्याचे आढळून आले. यावेळी सोमनाथ लहू भोजने याला ताब्यात घेतले. टेम्पोत टाक्या घेऊन विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला या टाक्या मालक विकास आकळे यांनी दिल्याचे सांगितले.

Pune police
Sangli Fraud Case : सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने १७ तरुणांची फसवणूक; साडेतेरा लाखात गंडविले

सव्वा दहा लाखांचा ऐवज जप्त
यावेळी पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीच्या तब्बल ७२ व्यावसायिक गॅस टाक्या आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच टाक्या विक्री करण्यास देणाऱ्या विकास धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com