Sangli Fraud Case
Sangli Fraud CaseSaam tv

Sangli Fraud Case : सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने १७ तरुणांची फसवणूक; साडेतेरा लाखात गंडविले

Sangli News : सांगली जिल्ह्यातील खरशिंग येथील सागर मोहिते मुंबई येथे परीक्षा देण्यासाठी गेला असताना त्याची राहुल कुमार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी राहुल कुमार यांनी इंडियन नेव्हीमध्ये ओळख असून तेथे भरती करतो व तुमचे नाव लवकर फायनल यादीत येईल
Published on

सांगली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष देत फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार सांगली जिल्ह्यात समोर आला असून भारतीय सैन्य दलात भरती करण्याचे आमिष देत १७ तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

सांगली जिल्ह्यातील खरशिंग येथील सागर मोहिते मुंबई येथे परीक्षा देण्यासाठी गेला असताना त्याची राहुल कुमार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी राहुल कुमार यांनी इंडियन नेव्हीमध्ये ओळख असून तेथे भरती करतो व तुमचे नाव लवकर फायनल यादीत येईल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत सागर याने त्याच्या मित्रांना देखील सांगितले. आपल्याला सैन्य दलात नोकरी लागेल या आशेने राहुलने सांगितल्यानुसार पैसे दिले.  

Sangli Fraud Case
Gram Panchayat EVM Support : पंढरपूर आणि पाटण ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएम समर्थनाचा ठराव; कारण काय?

साडेतेरा लाख दिले 

यामुळे सागर आणि त्यांच्या मित्रांकडून राहुल कुमार याने मार्च २०२२ पासून ते फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत इंडियन नेव्ही भरती करतो असे खोटे आमिष दाखवून राहुल आणि त्यांच्या मित्रांच्याकडील एकूण १३ लाख ५५ हजार रुपये ऑनलाईन आणि रोख दिले. मात्र पैसे देऊन देखील नोकरीचे काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समोर येताच त्यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

Sangli Fraud Case
Fake Medicine : नांदेडला देखील बनावट औषध पुरवठा; १ लाख २८ हजार गोळ्या केल्या सील

पोलिसांकडून तपास सुरु 

सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील तब्बल १७ मुलांना साडेतेरा लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले असून याप्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग येथील सागर मोहिते यांनी ही फिर्याद दिली आहे. तर बिहार येथील राहुल कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com