Amazon Great India Festival Sale 2026 Saam Tv
बिझनेस

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

Amazon Great India Festival Sale 2026: ॲमेझॉनकडून सर्वात मोठ्या फेस्टिवल शॉपिंग इव्हेंटच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला खरेदीची सुवर्णसंधी आहे. त्याद्वारे तुम्हाला स्वस्तात वस्तू खरेदी करता येणार आहे.

Priya More
  • ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२६

  • ॲमेझॉन सेल २०२६ च्या तारखेची घोषणा

  • ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये एसबीआय कार्डवर १० टक्के सूट

  • ॲमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या ऑफर्स

ॲमेझॉनने भारतातील आपल्या सर्वात मोठ्या फेस्टिवल शॉपिंग इव्हेंटची तारीख जाहीर केली. ॲमेझॉनच्या या सर्वात मोठ्या सेलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. या माध्यमातून अनेक जण सणासुदीचा जबरदस्त शॉपिंग करतात. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ हा ८ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे, फॅशन, सौंदर्य, किराणा आणि इतर श्रेणींमध्ये आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील. कंपनीने खरेदीदारांसाठी पेमेंट ऑफर्स, एक्सचेंज डील्स आणि इतर फायदे देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांना खरेदीचा चांगली संधी असणार आहे.

एसबीआय कार्डवर मोठी सूट मिळणार आहे. पात्र एसबीआय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट-कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनचा वापर करणारे ग्राहक सेल दरम्यान १० टक्के त्वरित सवलतीचा लाभ घेऊ शकतात. निवडक उत्पादनांवर एक्सचेंज ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील अपेक्षित आहेत ज्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि उपकरणे यांसारख्या उच्च श्रेणीच्या वस्तूंच्या सुरुवातीच्या किमती कमी होऊ शकतात.

ॲमेझॉन प्राइम 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' दरम्यान आपल्या सदस्यांसाठी अतिरिक्त लाभांची जाहिरात करत आहे. जाहिरात साहित्यानुसार, प्राइम सदस्यांना पात्र ऑफर्सवर १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त लाभ मिळू शकतात. हे उत्पादन आणि ऑफरनुसार बदलू शकते. ॲमेझॉन प्राइम ग्राहकांना याआधीही मोठ्या फेस्टिव सेल्समध्ये एक्सेस मिळाला आहे. कंपनी फास्ट डिलिव्हरी आणि विशेष डील्स यांसारख्या प्राइम लाभांची देखील जाहिरात करत आहे.

२०२६ च्या या इव्हेटमध्ये प्रमुख ब्रँड्सकडून सूट तसेच नवीन उत्पादनांचे अनावरण अपेक्षित आहे. ॲमेझॉन 'प्ले अँड विन रिवॉर्ड्स' या कॅम्पेनला देखील प्रोत्साहन देत आहे. ज्याच्या प्रमोशन मटिरीयलमध्ये स्मार्टफोन आणि इतर बक्षिसे दाखवण्यात आली आहेत. पात्रतेबद्दल आणि बक्षिसाच्या मूल्याबद्दल तपशील स्वतंत्रपणे प्रदान केला जाईल. कंपनी आपल्या AI-पावर्ड शॉपिंग टूल्सवरही फोकस करत आहे0 ज्यामध्ये ग्राहकांना उत्पादने शोधण्यात आणि पर्यायांची तुलना करण्यात मदत करणारे 'रुफस' (Rufus) तसेच एआय-निर्मित पुनरावलोकन सारांश प्रदान करणारे 'लेन्स एआय' (Lens AI) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

लालबाग परिसरात भक्तांना विजेचा धक्का, चिमुकलीसह महिलेचा मृत्यू, एक गंभीर

कोस्टलवर BMW कारचा भीषण अपघात, BMW फुटबॉलसारखी हवेत उडाली

SCROLL FOR NEXT