Xiaomi 14 Civi Offer: सणासुदीला मोठी संधी! Amazon सेलमध्ये Xiaomi 14 Civi वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Smartphone Deals: Xiaomi 14 Civi आता ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये आकर्षक सवलतीसह उपलब्ध होणार आहे. 23 सप्टेंबरपासून Amazon वर सुरू होणाऱ्या सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.
Amazon Great Indian Festival सेलमध्ये Xiaomi 14 Civi स्मार्टफोनवर तब्बल ₹16,499 ची सूट
XIAOMI 14 CIVI AMAZON SALE PRICE DROP – BIG DISCOUNT IN GREAT INDIAN FESTIVAL
Published On
Summary
  • अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

  • Xiaomi 14 Civi वर तब्बल ₹16,499 ची सूट उपलब्ध आहे.

  • बँक ऑफरनंतर हा स्मार्टफोन ₹26,499 मध्ये मिळेल.

  • दमदार प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरीसह हा फोन आकर्षक पर्याय ठरत आहे.

अमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा केली असून हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्राइम मेंबरना मात्र या सेलमध्ये एक दिवस आधी म्हणजेच २२ सप्टेंबरपासूनच प्रवेश मिळणार आहे. या दरम्यान स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. यामध्ये Xiaomi 14 Civi वरची ऑफर विशेष ठरत आहे.

कंपनीने Xiaomi 14 Civi ला ४२,९९९ रुपयांच्या किमतीत लाँच केले होते. मात्र या सेलमध्ये तो मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार आहे. Amazon वर हा स्मार्टफोन २७,९९९ रुपयांना आहे आणि बँक ऑफरनंतर तो २६,४९९ रुपयांना उपलब्ध होईल. ही किंमत फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी लागू आहे. सर्व ऑफर्सनंतर ग्राहकांना तब्बल १६,४९९ रुपयांची बचत होणार आहे, ज्यामुळे हा फोन खरेदी करणे एक फायदेशीर सौदा ठरतो.

Amazon Great Indian Festival सेलमध्ये Xiaomi 14 Civi स्मार्टफोनवर तब्बल ₹16,499 ची सूट
Amazon Great Indian Festival: अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये धमाकेदार ऑफर्स, फोन, टीव्हीवर मोठी सूट

Xiaomi 14 Civi मध्ये 6.55-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला असून तो 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेला संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 दिलेले आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

Amazon Great Indian Festival सेलमध्ये Xiaomi 14 Civi स्मार्टफोनवर तब्बल ₹16,499 ची सूट
Samsung Galaxy F17 5G: कमी बजेटमध्ये मोठा धमाका! Samsung Galaxy F17 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कॅमेराच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. यात ५० मेगापिक्सेलचा मेन लेन्स, ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सेलचे दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. याशिवाय या फोनमध्ये ४७०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती ६७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सवलतीच्या आकर्षक किमतीत दमदार परफॉर्मन्स आणि कॅमेरा क्वालिटी मिळणारा Xiaomi 14 Civi या सेलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Q

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधी सुरू होणार आहे?

A

हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्राइम मेंबरांना २२ सप्टेंबरपासूनच प्रवेश मिळेल.

Q

Xiaomi 14 Civi ची मूळ किंमत किती आहे?

A

हा स्मार्टफोन कंपनीने सुरुवातीला ₹42,999 ला लाँच केला होता.

Q

सेलमध्ये Xiaomi 14 Civi कितीला मिळणार आहे?

A

Amazon वर हा फोन ₹27,999 ला सूचीबद्ध आहे, तर बँक ऑफरनंतर फक्त ₹26,499 मध्ये मिळेल.

Q

या फोनची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत?

A

Xiaomi 14 Civi मध्ये 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, दोन 32MP फ्रंट कॅमेरे आणि 4700mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com