सॅमसंग गॅलेक्सी F17 5G कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह लाँच
5000mAh बॅटरी, Exynos 1330 प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा
Google Gemini आणि Circle to Search सारखे AI फीचर्स उपलब्ध
दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध किंमत ₹14,499 पासून सुरू
सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy F17 5G लाँच केला आहे. कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह आलेल्या या हँडसेटमध्ये 5G सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी, Exynos 1330 प्रोसेसर आणि आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. हा फोन केवळ 7.5mm जाडीचा असून IP54 रेटिंगसह येतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy F17 5G फिचर्स
सॅमसंग गॅलेक्सी F17 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ इन्फिनिटी-यू सुपर एमोलेड डिस्प्ले असून, 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Exynos 1330 प्रोसेसर, 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजची सुविधा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित OneUI 7 वर काम करतो. कंपनीने या डिव्हाइससाठी 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सची हमी दिली आहे.
कॅमेराच्या दृष्टीने पाहता, गॅलेक्सी F17 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी लेन्स, 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. फ्रंटला 13MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या हँडसेटला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
खास फिचर्स
या स्मार्टफोनची आणखी एक खासियत म्हणजे त्यातील AI फीचर्स. यामध्ये गुगल जेमिनी(Google Gemini) आणि सर्कल टू सर्च यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. हे फीचर्स गेल्या महिन्यात लाँच झालेल्या गॅलेक्सी A17 5G प्रमाणेच आहेत. कंपनीने गॅलेक्सी F17 5G दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणला आहे.
मॉडेलची किंमत
4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,499 रुपये असून, 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन निओ ब्लॅक आणि व्हायलेट पॉप अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असून तो सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F17 5G मध्ये कोणता प्रोसेसर आहे?
या फोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर दिला आहे.
गॅलेक्सी F17 5G ची बॅटरी किती आहे?
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोनमध्ये कोणते एआय फीचर्स आहेत?
यात Google Gemini आणि Circle to Search सारखी AI फीचर्स उपलब्ध आहेत.
गॅलेक्सी F17 5G ची किंमत किती आहे?
4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये तर 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.