Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

Sakshi Sunil Jadhav

जानेवारीपासून नवे नियम लागू

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट दाखवण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. ग्राहकांना किंमतीबद्दल जास्त स्पष्ट माहिती देणं बंधनकारक केलं जाणार आहे.

Ecommerce Rules

Reduced Price आणि Prior Price

एखाद्या वस्तुवरची किंमत कमी केल्याने मूळ आणि सवलतीची किंमत दोन्ही दाखवावी लागेल. यामुळे ग्राहकांना मिळणारी सूट नेमकी किती आहे, हे सहज समजणार आहे.

Ecommerce Rules

‘Prior Price’ म्हणजे काय?

डिस्काउंट जाहीर करण्यापुर्वीच्या ३० दिवसांमध्ये वस्तू ज्या सर्वात कमी किमतीत विकली गेली, ती ‘Prior Price’ मानली जाईल. त्यावर आधारित सवलत दाखवावी लागणार आहे.

e-commerce consumer complaints

फेस्टिव्हल सेलचे नियम

दिवाळी, दसरा किंवा इतर सणांच्या सेलमध्येही या नियमांचं पालन करावं लागेल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंमतीत चुकीची माहिती दाखवता येणार नाही.

e-commerce consumer complaints

किंमतीतला बदल

नवीन नियमांचा मुख्य उद्देश ई-कॉमर्स व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे. ग्राहकांना वस्तूच्या खऱ्या किंमतीची योग्य माहिती मिळायला मदत होईल.

online shopping discount

सर्च रिझल्टमधला बदल

ग्राहकांची दिशाभूल होईल अशा पद्धतीने सर्च रिझल्टमध्ये फेरफार करण्यास मनाई करण्यात आली आहे. एखाद्या वस्तूचा शोध घेताना त्याची संबंधितता आणि माहिती अबाधित ठेवावी लागेल.

online shopping discount

Sponsored Listings वरही लक्ष

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील sponsored listings संदर्भातही पारदर्शकता वाढवण्यावर भर आहे. जाहिराती आणि सामान्य उत्पादनांमधला फरक ग्राहकांना स्पष्टपणे समजणे महत्त्वाचे ठरणार आहे.

e-commerce price transparency

ऑनलाइन खरेदीच्या तक्रारी

National Consumer Helpline कडे २०२५ मध्ये संख्येने ई-कॉमर्सविषयक तक्रारी दाखल झाल्या.एकूण तक्रारींपैकी जवळपास २९ टक्के तक्रारी ई-कॉमर्स क्षेत्राशी संबंधित होत्या.

e-commerce price transparency

ग्राहकांना फायदा

नियम कडक झाल्यामुळे चुकीची डिस्काउंट माहिती आणि ग्राहकांची दिशाभूल कमी होण्याची शक्यता आहे.

e-commerce price transparency

NEXT : मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

80s Retro Trend
येथे क्लिक करा