SBI Bank Robbery : एसबीआय बँकेत दरोडा, ५८ KG सोनं अन् ८ कोटींचा कॅशवर मारला हात, पंढरपूरमध्ये मिळाली चोरट्यांची कार

Karnataka SBI robbery : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील एसबीआय बँकेत दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी ५८ किलो सोनं आणि ८ कोटी रूपये रोख रक्कम लंपास केली. दरोड्यासाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील पंढरपूर येथे सापडली
SBI
SBI Saam Tv
Published On
Summary
  • विजापूरमधील एसबीआय बँकेत चोरट्यांनी दरोडा टाकला.

  • ५८ किलो सोनं आणि ८ कोटी रूपये रोख लुटले गेले.

  • चोरट्यांनी आर्मीचा वेष परिधान करून दरोडा टाकला.

  • पंढरपूरमध्ये चोरट्यांची कार सापडली असून संयुक्त तपास सुरू आहे.

SBI bank robbery Karnataka 58 kg gold and 8 crore cash stolen : देशातील सर्वात मोठ्या बँकेत चोरट्यांनी हात साफ केलाय. कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील एका एसबीआय बँकेत दरोडा टाकण्यात आला. तोंडावर मास्क, हत्यारे घेऊन आलेल्या चोरांनी बँकेतून ५८ किलो सोनं आणि ८ कोटी रूपयांचा रोख कॅश लंपास केला. या घटनेनंतर कर्नाटकमध्ये एकच हाहाकार उडाला आहे. या दरोड्यासाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आढळली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांकडून या दरोड्याचा संयुक्त तपास करण्यात येत आहे. दरोड्यानंतर बँकेत अन् बाहेरच्या परिस्थितीचा व्हिडिओ समोर आलाय. शेकडो लोक रस्त्यावर दिसत आहेत, त्याशिवाय तपास आधिकारीही आपले काम करत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.

आर्मीच्या वेषात आले अन् बँक लुटून गेले

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी सायंकाळी दरोडेखोरांनी बँक लुटली. लष्काराच्या ड्रेसवर अन् तोंडावर मास्क लावून काही लोक अचानक बँकेत घुसले. त्यांनी बंदूक आणि हत्याराने मॅनेजर, कॅशियर आणि कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यांनी बँकेचा आलार्म वाजवू दिलाच नाही. चोरट्यांनी बँकेतील सर्वांना बांधून ठेवले अन् हात साफ केला. चोरट्यांनी आर्मीचा ड्रेस घातला होता. त्यांनी बँकेतील सोनं अन् पैशांवर हात साफ केला अन् कारमधून पसार झाले असे रिपोर्ट्समधून समोर आलेय.

SBI
CCTV Video : वेगात कार आली अन् दुकानाला धडकली, ३ जणांचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

महाराष्ट्रात मिळाली चोरट्यांची कार -

विजापूरमधील एसबीआय बँकेत चोरट्यांनी हात साफ केला. त्यानंतर त्यांनी कोट्यवधी रूपये घेऊन पळ काढला. चोरट्यांनी या दरोड्यात वापरलेली कार महाराष्ट्रात मिळाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी चोरांचा एकत्र तपास सुरू केला आहे. दोन राज्यातील पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. चोरांची कार महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये आढळली. पोलिसांकडून दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केलेली आहे.

SBI
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com