8th Pay Commission  meta ai
बिझनेस

8th Pay Commission : लेवल-10 कर्मचाऱ्यांची लॉटरी! तब्बल ₹५७,०००+ HRA मिळणार? पाहा संपूर्ण हिशोब

8th Pay Commission HRA : आठव्या वेतन आयोगानंतर लेवल १० कर्मचाऱ्यांचा HRA मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या अधिसूचनेनंतरच स्पष्ट होईल.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या आठव्या वेतन आयोगाकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. नवीन वेतनरचना लागू झाल्यानंतर बेसिक पगारासोबत हाउस रेंट अलाउन्स (HRA) मध्येही मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या समोर येणार आकडे हे पूर्णपणे अंदाजावर आधारित असून अंतिम निर्णय सरकारच्या अधिसूचनेनंतरच स्पष्ट होणार आहे.

सध्या जानेवारी २०२४ पासून X, Y आणि Z शहरांसाठी अनुक्रमे ३०%, २०% आणि १०% HRA लागू आहे. कर्मचारी संघटनांकडून मात्र HRA वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. NC-JCM आणि AIDEF यांनी X, Y आणि Z शहरांसाठी ४०%, ३५% आणि ३०% HRAची मागणी केली आहे. IRTSAने ४०%, ३०%, २०% आणि १०% अशा चार HRA दरांचा प्रस्ताव मांडला आहे.

HRA हा थेट बेसिक पगारावर आधारित असतो. त्यामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरच्या माध्यमातून बेसिक पे वाढल्यास HRAची रक्कमही वाढू शकते.

उदाहरणार्थ, सातव्या वेतन आयोगानुसार लेवल-१० कर्मचाऱ्याचे बेसिक पे ₹५६,१०० आहे. सध्याच्या दरानुसार X शहरात ₹१६,८३०, Y शहरात ₹११,२२० आणि Z शहरात ₹५,६१० HRA मिळतो.

आता २.५७ फिटमेंट फॅक्टर आणि ४०% HRAचा अंदाज गृहीत धरल्यास लेवल-१० कर्मचाऱ्याचा HRA सुमारे ₹५७,६७१ प्रति महिना होऊ शकतो. त्यामुळे ₹५७ हजारांपेक्षा जास्त HRAची चर्चा होत आहे. मात्र, हा आकडा निश्चित नाही. 8व्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, नवीन बेसिक पे, शहराची श्रेणी आणि HRAचे मंजूर दर यावर प्रत्यक्ष रक्कम अवलंबून असेल. त्यामुळे सध्या ₹५७ हजार HRA हा संभाव्य अंदाज म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्किंग वुमनसाठी मॉडर्न मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून तुम्हीही व्हाल खूश

Pension Rules : दुसऱ्या पत्नीलाही पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर

आनंदाची बातमी! LPG सिलेंडर झालं स्वस्त; कुठे आणि किती रुपयांना मिळतंय गॅस सिलेंडर?

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे खोळंबली, कळव्याजवळ तांत्रिक बिघाड

विचार करा, ममता दीदीचं काय झालं? निवडणुकीआधी सपा अन् काँग्रेस भिडले

SCROLL FOR NEXT