Sakshi Sunil Jadhav
सर्वप्रथम तुम्ही डिजिटल ७/१२ मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या Mahabhumi पोर्टलवर जाऊन Digital Signed 7/12 ही सेवा निवडा.
पोर्टलवरच्या सशुल्क सेवांमध्ये Digital Signed 7/12 पर्याय उपलब्ध असून त्यावरून अधिकृत प्रत डाउनलोड करता येते.
नवीन वापरकर्त्याने नोंदणी करून खातं तयार करा, तर आधीपासून खाते असल्यास उपलब्ध लॉगिन पर्यायातून प्रवेश करता येतो.
लॉगिन केल्यावर जमिनीशी संबंधित जिल्हा निवडा. यानंतर जमिनीशी संबंधित तालुका आणि गाव अचूकपणे निवडा.
जमीन शोधण्यासाठी गट नंबर वापरून संबंधित नोंद निवडता येते.
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उतारा डाउनलोड करण्यासाठी प्रति प्रत १५ रुपये शुल्क आकारतात.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर संबंधित नोंद निवडून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ची प्रत डाउनलोड करता येते.
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उतारा शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वैध असल्याचे महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले आहे.